TRENDING:

ठाण्यातील रीलस्टारच्या आलिशान बंगल्यात शस्त्रास्त्रांचा मोठा साठा, मिनी आर्मी तयार करत होता सुरेंद्र पाटील?

Last Updated:

डोंबिवलीचा हिस्ट्रीशीटर आणि सोशल मीडियावरील 'रील स्टार' सुरेंद्र पांडुरंग पाटील (५५) पुन्हा एकदा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जामिनावर तुरुंगाबाहेर येऊन जेमतेम दोन आठवडे उलटत नाहीत तोच, डोंबिवलीचा हिस्ट्रीशीटर आणि सोशल मीडियावरील 'रील स्टार' सुरेंद्र पांडुरंग पाटील (५५) पुन्हा एकदा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. ठाणे गुन्हे शाखेने शनिवारी मध्यरात्री सुरेंद्रच्या बंगल्यावर छापा टाकून शस्त्रास्त्रांचा असा काही साठा जप्त केला आहे. घरात एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र सापडल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत.
News18
News18
advertisement

एका गुप्त माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने दावडी येथील सुरेंद्र पाटील याच्या आलिशान बंगल्यावर मध्यरात्री छापा टाकला. झडती घेत असताना पोलिसांची नजर बंगल्यातील एका शू-रॅकवर पडली. बंगल्याच्या इंटिरिअरशी न जुळणारे हे कपाट पाहून पोलिसांना संशय आला. जेव्हा त्याची सखोल तपासणी करण्यात आली, तेव्हा त्यातील एका गुप्त कप्प्यात शस्त्रास्त्रांचा मोठा साठा दडवून ठेवल्याचं उघड झालं.

advertisement

या कारवाईत पोलिसांनी तब्बल ७ बंदुका, ३७१ जिवंत काडतुसे आणि १६७ एअर गनच्या गोळ्या जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या या साठ्याची किंमत सुमारे १० लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.

रीलस्टारकडे 'Made in USA' पिस्तूल

जप्त करण्यात आलेल्या सात बंदुकांपैकी पाच देशी बनावटीची पिस्तूलं आणि रिव्हॉल्व्हर आहेत, तर दोन एअर गन आहेत. धक्कादायक म्हणजे, काही पिस्तुलांवर 'Made in USA' आणि 'Special Auto' असं कोरलेलं आहे. पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी माहिती दिली की, इतक्या मोठ्या प्रमाणावर जिवंत काडतुसे सापडणं हे सूचित करतं की, हा साठा केवळ प्रदर्शनासाठी नसून तो वापरण्यासाठी सज्ज होता.

advertisement

केवळ रील बनवण्यासाठी की गुन्हेगारांना पुरवण्यासाठी?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांदा दर पडलेलेच, लिंबाला काय मिळतोय भाव?
सर्व पहा

सुरेंद्र पाटील हा इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रिय असून त्याचे ३ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. स्वतःची गुंडगिरी आणि 'भाईगिरी' दाखवणारे रिल्स तो सतत पोस्ट करत असतो. अटकेनंतर त्याने हा साठा केवळ रिल्समध्ये वापरण्यासाठी ठेवल्याचा दावा केला आहे. मात्र, त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे पोलीस या दाव्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. हा शस्त्रसाठा स्थानिक गुन्हेगारांना पुरवण्यासाठी वापरला जात होता का? याचा तपास आता सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/ठाणे/
ठाण्यातील रीलस्टारच्या आलिशान बंगल्यात शस्त्रास्त्रांचा मोठा साठा, मिनी आर्मी तयार करत होता सुरेंद्र पाटील?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल