TRENDING:

डोंबिवली सुन्न! खेळायला गेलेला लेक घरात परतलाच नाही, उघड्या फीडर पिलरचा धक्का लागून चिमुकल्या कृष्णाचा मृत्यू

Last Updated:

डोंबिवलीमध्ये रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या फिडर पिलरला चुकून स्पर्श होऊन एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे डोंबिवली शहरावर शोककळा पसरली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
डोंबिवली: डोंबिवली पूर्वेत विद्युत प्रवाहाचा धक्का लागल्यामुळे एका 7 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या लाईटीच्या बॉक्सला (फिडर पिलर) चुकून स्पर्श होऊन मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे डोंबिवली पूर्वेत शोककळा पसरली असून यादव कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. खेळत असताना चुकून विजेच्या बॉ़क्सला स्पर्श झाल्यामुळे या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला आहे.
News18
News18
advertisement

डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी परिसरातील जिजाईनगरमध्ये रविवारी सकाळी 7 वर्षीय कृष्णा घराच्या मागच्या मोकळ्या भागात बॉल खेळत होता. बॉल खेळत असताना चुकून समोरच्या सोसायटीच्या लाईटच्या फिडर पिलरजवळ गेला. पिलर जवळून बॉल आणत असताना त्याचा चुकून हात त्या पिलरला लागला. पिलरला स्पर्श होताच कृष्णाला विजेचा जोरात धक्का बसला. त्यामुळे तो त्या पिलरला चिटकून बेशुद्ध पडला. त्याला लगेचच स्थानिकांनी आणि आई- वडिलांनी जवळच्या एका खासगी रूग्णालयामध्ये नेले. पण त्याला तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले.

advertisement

स्टार कॉलनीतल्या एसीई हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आलं. पण तिथल्या डॉ. मुकुंद केणे यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे फक्त परिसरातच नाही तर, यादव कुटुंबीयांवरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कृष्णाच्या अपघाती मृत्यूची नोंद टिळकनगर पोलि‍सांत करण्यात आली आहे. कृष्णाचे वडील संजय यादव यांनी घटनेची सर्व माहिती पोलिसांना दिली. संजय यादव यांनी सांगितले की, " गेल्या आठ वर्षांपासून जिजाईनगरमधील विठ्ठल कृपा इमारतीमध्ये आम्ही राहत आहोत. डोंबिवलीमध्येच टेम्पो चालवून मी माझ्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो आणि वडील मेवालाल यादव भाजीचा व्यवसाय करतात."

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षला 12000 रुपये भाव, लिंबू दरही तेजीत, कांद्याची काय स्थिती? Video
सर्व पहा

"अशा पद्धतीने आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आम्ही करतो. घरी मी, बायको, आई- वडील आणि दोन मुलं असा आमचा परिवार आहे. ", अशी माहिती संजयने पोलिसांना दिली. दरम्यान, कृष्णाला खासगी रूग्णालयात मृत घोषित केल्यानंतर महापालिकेच्या शास्रीनगर रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. त्यानंतर कृष्णाचे पार्थिव कुटुंबीयांकडे सोपवले.

मराठी बातम्या/ठाणे/
डोंबिवली सुन्न! खेळायला गेलेला लेक घरात परतलाच नाही, उघड्या फीडर पिलरचा धक्का लागून चिमुकल्या कृष्णाचा मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल