मिरा रोडच्या ए. बी. प्रॉपर्टी मॅनेजमेंटचे अमित कुमार रामजीत शुक्ला आणि अनिल शिवचरण सिंग यांनी रूम खरेदी काढण्यासाठी काढला होता. गौरव व्हॅली संकुलातील डॅफोडिल्म इमारतीतील फ्लॅट विक्रीसाठी काढला होता. हा फ्लॅट त्यांनी दहिसर पूर्वेतील रहिवासी विभूप्रसाद पट्टजोशी यांना विकला. हा फ्लॅट विकताना त्यांनी गिऱ्हाईकाला चांगलाच लाखोंचा गंडा घातला आहे. फ्लॅटवरील थकीत लोन आणि मेंटेनेन्सबद्दल काहीही माहिती न सांगता थेट रूम विक्रीसाठी काढला होता. त्यामुळे अमित कुमार शुक्ला आणि अनिल सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
अमित कुमार शुक्ला आणि अनिल सिंग यांनी रूमची विक्री करताना फ्लॅटवर 15 लाखांचे कर्ज असल्याचे सांगितले. जे की रूमवर 65 लाखांचं कर्ज होतं. इतकंच नाही तर, सोसायटी मेंटेनेन्स सुद्धा लाखांच्या घरात थकीत असताना केवळ 30 हजार असल्याचे सांगून घर खरेदी करायला आलेल्या गिऱ्हाईकाची फसवणूक केली. फ्लॅटचे 22 लाख रूपये आणि अमित शुक्लाने 1 लाख रूपये दलाली म्हणून घेतले होते, अशी एकूण 23 लाख रूपयांची फसवणूक केल्यामुळे काशीगाव पोलीस ठाण्यामध्ये, अमित कुमार शुक्ला आणि अनिल सिंग विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री शिंदे तपास करीत आहेत.
घर खरेदी करायला येणार्या गिर्हाईकांची अशी अनेकदा घर मालकाकडून करण्यात आलेली आहे. यामुळे वेगवेगळ्या प्रॉपर्टी कन्सल्टरकडून गिर्हाईकांना सर्व गोष्टी व्यवस्थित पाहूनच घर खरेदी करण्याचा सल्ला दिला जात आहे. गिर्हाईकांची अशा पद्धतीने फसवणूक होण्याचा प्रकार काही पहिल्यांदा घडलेला नाही. त्यामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
