TRENDING:

बदलापूर प्रकरणानंतर ठाणे मनपा 'अ‍ॅक्शन मोड'! 11 IVF सेंटर्सवर धाडी; शहर हादरलं

Last Updated:

ठाणे मनपाने शहरातील IVF सेंटर आणि IVF ART बँक सेंटरवर एकाच वेळी धाडी टाकून तपासणी केली

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे : बदलापूर येथील स्त्रीबीज तस्करी प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवून दिल्यानंतर ठाणे महानगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आरोग्य विभागाने अॅक्शन मोडमध्ये आले असून संपूर्ण शहरात व्यापक तपास मोहीम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे मनपाने शहरातील IVF सेंटर आणि IVF ART बँक सेंटरवर एकाच वेळी धाडी टाकून तपासणी केली. या मोहिमेत एकूण सात IVF सेंटर आणि चार IVF ART बँक सेंटरची कसून तपासणी करण्यात आली.
News18
News18
advertisement

आरोग्य विभागाच्या पथकाने संबंधित केंद्रांमधील नोंदवही, परवाने, वैद्यकीय उपकरणे, साठवणूक प्रक्रिया, रुग्णांची नोंद तसेच कायद्याने निर्धारित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होत आहे की नाही, याची सखोल पाहणी केली. या तपासणीत सध्या तरी कोणतेही संशयास्पद किंवा नियमबाह्य प्रकार आढळून आले नसल्याचे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र, याचा अर्थ भविष्यातील तपासणीस सूट मिळेल असा नसून, सर्व केंद्रांना कडक ताकीद देण्यात आली आहे.

advertisement

तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करणार 

IVF उपचार आणि ART बँक संबंधित कोणतेही नियमबाह्य काम, अवैध स्रीबीज प्रक्रिया, परवान्याविना उपचार किंवा आर्थिक फसवणूक आढळल्यास संबंधितांवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. या कारवाईत कोणतीही हयगय केली दाखवली जाणार नाही, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

आरोग्य यंत्रणाच संशयाच्या भोवऱ्यात

बदलापूर येथील स्रीबीज प्रकरणाचे मुख्य केंद्र ठाण्यात असल्याचे तपासात समोर आले होते. ठाण्यात काही ठिकाणी महिलांचे बेकायदेशीर स्रीबीज संकलन व साठवणूक केली जात असल्याची गंभीर माहिती पुढे आली होती. त्यानंतर बदलापूर पोलिसांनी ठाण्यातील एका अवैध IVF ART बँक सेंटरवर धाड टाकत मोठी कारवाई केली होती. या प्रकरणामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

advertisement

अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले

या पार्श्वभूमीवर ठाणे मनपाने घेतलेली ही धडक कारवाई आरोग्य सेवांतील पारदर्शकता, कायद्याचे काटेकोर पालन आणि रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. भविष्यातही अशीच सातत्यपूर्ण तपासणी सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले असून, यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. बदलापूर शहरात अवैधरित्या स्रीबीज तयार करुन त्याची तस्करी केली जात होती. या प्रकरणी आता मोठे मोठे खुलासे होत  लागले आहेत. अवघ्या 15 ते 20 हजार रुपये स्री बीज विक्री करणा-या महिलांना दिले जातात पणा या स्रीबीजची तस्करीच्या बाजारात कोट्यवधी रुपयांचा विकले जायचे

advertisement

हे ही वाचा:

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
थंडगार पाण्यासाठी माठ कसा निवडायचा? काळा की लाल चांगला कोणता?
सर्व पहा

आई होण्याच्या स्वप्नांचा 'बाजार'! स्त्रीबीज तस्करीच्या दरांनी महाराष्ट्र हादरला; देखणेपणावर ठरतो सौदा; रेट कार्ड समोर

मराठी बातम्या/ठाणे/
बदलापूर प्रकरणानंतर ठाणे मनपा 'अ‍ॅक्शन मोड'! 11 IVF सेंटर्सवर धाडी; शहर हादरलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल