TRENDING:

Thane : ठाणे-नाशिक महामार्ग कोंडीमुक्त होणार; मिळणार दोन नवे पर्याय; प्लॅन काय?

Last Updated:

Thane-Nashik Highway : ठाण्यातून नाशिकला किंवा नाशिकहून ठाण्यात येत असलेल्या वाहनचालकांना आता वाहतूककोंडीतून लवकर सुटका मिळणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे : ठाणे-नाशिक महामार्गावरील कायमस्वरूपी वाहतूककोंडी कमी करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा होत असल्याने सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी प्रचंड ट्रॅफिक जॅम होत होता. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
Mumbai Nashik Highway traffic update 2026
Mumbai Nashik Highway traffic update 2026
advertisement

नाशिकला जाणं आता होणार सोपं

महामार्गवरील वाहतूकोंडीवर उपाय म्हणून नव्या साकेत उड्डाण पुलाच बांधण्याच आलेला असून तो वाहतूकीसाठी खुला करण्यात आलेला आहे. या नव्या पुलामुळे ठाणेहून नाशिककडे जाणाऱ्या वाहनांना आता काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

मात्र याआधी जुन्या साकेत पुलाची अवस्था खराब झाली होती. पुलाकडे जाणारे अनेक रस्ते अपूर्ण होते आणि मार्गिका अरुंद असल्याने वाहतूक मंदावत होती. विशेषतहा अवजड वाहनांमुळे मोठी कोंडी होत होती. या समस्येबाबत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी वारंवार प्रश्न उपस्थित केला होता.

advertisement

जुन्या साकेत पुलाच्या दुरुस्तीला सुरुवात

यानंतर एमएसआरडीसी यांनी नव्या पुलाची तपासणी करून मंगळवारी वाहतूक सुरू केली. मात्र जुन्या पुलाच्या सुरुवातीला रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने अडथळे अजूनही जाणवत होते. त्यामुळे आता जुन्या पुलाची दुरुस्ती आणि पोहोच रस्त्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तलवारबाजी, भाला अन् दांडपट्टा, 9 वर्षाच्या मावळ्याचा पराक्रम, Video पाहाल तर...
सर्व पहा

याशिवाय दिवा अंडरपास परिसरात सध्या फक्त दोन लेन सुरू आहेत. मार्चअखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आणखी दोन लेन सुरू करण्याचे नियोजन आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर ठाणे-नाशिक मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे.

advertisement

मराठी बातम्या/ठाणे/
Thane : ठाणे-नाशिक महामार्ग कोंडीमुक्त होणार; मिळणार दोन नवे पर्याय; प्लॅन काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल