त्यामुळे या परिसरातील पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. या वॉल्वची दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचं आहे. यासाठी शुक्रवारी 2 जानेवारी रोजी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असणार आहे. या दिवशी ठाणे महानगरपालिका व स्टेम (STEM) प्राधिकरणाकडून होणार्या पाणी पुरवठा योजनेचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नववर्षाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच, 2 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9:00 ते रात्री 9:00 वाजेपर्यंत घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तक नगर, साकेत, ऋतूपार्क, जेल, गांधीनगर, सिध्दांचल, इंदिरा नगर, रुपादेवी, श्रीनगर, समता नगर, सिद्धेश्वर, इटरनिटी, जॉन्सन, मुंब्रा आणि कळव्याच्या काही भागात 12 तासांसाठी पूर्णपणे पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
advertisement
पाणी कपातीच्या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये एकूण 29 महानग पालिकांची निवडणूका तोंडावर आहे. त्याचवेळी ठाणे महागनरपालिकेची सुद्धा निवडणूक आहे. सर्व महानगरपालिकांच्या निवडणूका येत्या 15 जानेवारी 2026 ला पार पडणार आहे. तर 16 जानेवारीला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. निवडणूकीच्या तोंडावरच पाणी पुरवठ्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पाणी टंचाईच्या समस्यांना नेहमीच सामोरं जावं लागत असल्याने येथील नागरिकांनी महापालिका प्रशासना विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
