रिक्षाची कंटेनरला भीषण धडक
मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेली ही दोघेही मुंब्रा येथील रहिवाशी होते. त्या दिवशी रिक्षा चालकासह चौघेजण रिक्षातून पेणच्या दिशेने प्रवास करत होते. पहाटेच्या सुमारास चिंचवण परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरला रिक्षा जोरात धडकली. धडक इतकी भीषण होती की रिक्षाचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला.
दोन प्रवाशांचा जागीच अंत
advertisement
या अपघातात रफिक अन्सारी आणि फातिमा अन्सारी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रिक्षामधील आणखी एक महिला आणि एक लहान मुलगी गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. रस्त्यावर कंटेनर उभा असण्यामुळे अपघात झाला का याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
