पालघर: पालघरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वाडा इथं बाजारपेठेत एका भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीस्वाराचा भीषण अपघात झाला आहे. दुचाकी स्लिप झाल्यानंतर समोरून येणाऱ्या ट्रेलरच्या चाकाखाली तरुण सापडला. या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील वाडा येथील बाजारपेठेत २२ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. वाडाच्या बाजारपेठेत सकाळी नेहमी सारखी वर्दळ होती. यावेळी एका दुचाकीवरून दोन तरुण वेगात जात होते.
advertisement
पण, अचानक या तरुणाचं दुचाकीवरील नियंत्रण सुटलं. दुचाकी स्लिप झाली. त्यामुळे दोघेही खाली पडले. पण, तितक्यात समोरून एक भरधाव ट्रक आला. ट्रकला पाहून दोघांना सावरण्याचा प्रयत्न केला, पण, समोरील चाकाला दुचाकीवर मागे बसलेल्या साईनाथ सालकर धडकला. ट्रक वेगात असल्यामुळे काही कळण्याच आत साईनाथ हा ट्रकच्या पहिल्या चाकाला धडकून मागील चाकाखाली आला. ट्रक वेगात असल्यामुळे अवघ्या ३ सेकंदात हा प्रकार घडला.
ट्रकच्या मागील चाकाखाली खाली आल्याामुळे अपघातात गावात राहणारा साईनाथ सालकर हा गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी धाव घेतली. दोघांनी ताताडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे. जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.
