TRENDING:

Famous Misal : टॉप 4 शहरातील कट दार झणझणीत मिसळ खायची? मुंबईत हे ठिकाण आहे बेस्ट, किंमत...

Last Updated:

मुंबई मिसळ, पुणेरी मिसळ, नाशिकची मिसळ तसेच तिखट आणि झणझणीत कोल्हापुरी मिसळ अशा वेगवेगळ्या प्रकारांची येथे रेलचेल आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : प्रभादेवी स्टेशनपासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर आणि परेल एसटी डेपोच्या बाहेर असलेला गावडेंची मिसळ हा फूड स्टॉल सध्या खवय्यांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. या ठिकाणी एकाच छताखाली विविध शहरांची खासियत असलेली मिसळ चाखण्याची संधी मिळत आहे. मुंबई मिसळ, पुणेरी मिसळ, नाशिकची मिसळ तसेच तिखट आणि झणझणीत कोल्हापुरी मिसळ अशा वेगवेगळ्या प्रकारांची येथे रेलचेल आहे.
advertisement

गावडेंची मिसळच्या मालकीन दीपिका गावडे सांगतात, मुंबईमध्ये मुंबई स्टाइल मिसळ सहज मिळते, पण पुणे, नाशिक किंवा कोल्हापूरची अस्सल चव इथे क्वचितच मिळते. त्यामुळेच आम्ही बाहेरील शहरांची मिसळ मुंबईकरांसाठी उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या या संकल्पनेला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आर्किटेक्ट बनला हॉटेल मालक! पुण्यात 30 रुपयांत देतोय प्रोटीन-रिच ! हॉटेल रुस्तम राईस ची खासियत काय ? पाहा Video

advertisement

या स्टॉलची आणखी एक जमेची बाजू म्हणजे दर. येथे मिसळची किंमत केवळ 45 रुपयांपासून सुरू होऊन 55 रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसालाही परवडेल अशी ही चवदार मेजवानी ठरते. कमी दरात दर्जेदार आणि पोटभर पदार्थ मिळत असल्यामुळे विद्यार्थी, नोकरदार आणि स्थानिक रहिवासी येथे मोठ्या संख्येने भेट देताना दिसतात.

मिसळसोबतच गावडेंची मिसळ येथे आठवड्याच्या वारांनुसार वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थही ठेवले जातात. सोमवारी मकई रोल, मंगळवारी मेथी पराठा, बुधवारी आप्पम, गुरुवारी साबुदाणा खिचडी, शुक्रवारी ढोकळा आणि शनिवारी घावणे असा खास मेन्यू येथे मिळतो. आरोग्याचीही विशेष काळजी घेतली जाते. सर्व पदार्थ रिफाइंड सनफ्लॉवर ऑइलमध्ये तयार केले जातात. पाम ऑइलचा वापर येथे अजिबात केला जात नाही ही बाब ग्राहकांसाठी दिलासादायक आहे.

advertisement

याशिवाय गावडेंची मिसळ येथे काही होममेड प्रॉडक्ट्सही उपलब्ध आहेत. झिरो शुगर, कोणतेही प्रिझर्व्हेटिव्ह नसलेले आणि पाम ऑइलशिवाय तयार केलेले हे पदार्थ आरोग्यदायी मानले जातात. नाचणी कुकीज, घावण्याचे पीठ, मोदकाचे पीठ, पोहे चिवडा, कोकम आगळ, चकली, मुग लाडू अशा अनेक घरगुती पदार्थांची येथे विक्री केली जाते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
टॉप 4 शहरातील कट दार झणझणीत मिसळ खायची? मुंबईत हे ठिकाण आहे बेस्ट, किंमत...
सर्व पहा

चव, दर्जा, आरोग्य आणि परवडणारी किंमत यांचा उत्तम समतोल साधणारी गावडेंची मिसळ आज प्रभादेवी परिसरातील खवय्यांची आवडती ठिकाण बनत आहे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Famous Misal : टॉप 4 शहरातील कट दार झणझणीत मिसळ खायची? मुंबईत हे ठिकाण आहे बेस्ट, किंमत...
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल