किरकोळ वादातून चाकूने सपासप वार
मिळालेल्या माहितीनुसार,ही घटना 18 जानेवारी रोजी रात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास वागळे इस्टेट येथील सीपी तलावाजवळ बिसलरी कंपनीजवळ असलेल्या पुलावर घडली. राहुल सोनार हा आपल्या मित्रासोबत तेथे उभा असताना अचानक अंकुश भोपळे तेथे आला. यावेळी त्याने 'उस दिन तू मुझे क्या बोला?' असे म्हणत राहुलला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
advertisement
मित्राला वाचवायला गेला अन् स्वतःही जखमी झाला
शिवीगाळाचा जाब विचारताच अंकुश अधिक चिडला. रागाच्या भरात त्याने जवळ असलेला चाकू काढून राहुल सोनारवर हल्ला केला. या हल्ल्यात राहुल जखमी झाला. दरम्यान राहुलचा मित्र प्रथमेश उंबासे याने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र अंकुशने त्यालाही धक्का देत मारहाण केली.
घटनेनंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच श्रीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपीविरोधात हल्ला आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
