
छत्रपती संभाजीनगर : निष्पाप वयातला खेळ एका क्षणात किती धोकादायक ठरू शकतो, याचा अंगावर शहारा आणणारा प्रकार शहरात घडला. वेगवेगळ्या ठिकाणी खेळत असताना दोन पाच वर्षांच्या चिमुकलींच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली. एका मुलीच्या डोळ्यात जमिनीवर पडलेली लोखंडी तार घुसली, तर दुसऱ्या मुलीच्या डोळ्याला चिंचेच्या काडीने जबर मार लागला. दोन्ही घटनांमध्ये डोळ्यांची इजा अत्यंत गंभीर स्वरूपाची होती. वेळेत उपचार मिळाले नसते, तर कायमस्वरूपी दृष्टी जाण्याचा मोठा धोका होता. सुदैवाने दोन्ही मुलींना एकाच दिवशी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले