
छत्रपती संभाजीनगर : थंडीच्या दिवसांत तीळ खाण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. तिळात उष्णता असते आणि त्यामुळे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. विविध पदार्थांच्या माध्यमातून तीळ आपण खाऊ शकतो. पण तीळ खाण्याचे प्रमाण किती असावे? आणि निरोगी जीवनासाठी किती प्रमाणात तीळ खावेत? याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती दिली आहे.