TRENDING:

BBM6: रितेश भाऊच्या धक्क्याआधीच आतली बातमी फुटली! दुसऱ्या आठवड्यात शॉकिंग एलिमिनेशन, कोणचा गेम ओव्हर?

Last Updated:
Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी ६' सुरू होऊन आता दोन आठवडे उलटले आहेत. पहिल्या आठवड्यात रितेश देशमुखने सर्वांना एक संधी दिली होती, पण यावेळचा भाऊचा धक्का मात्र कुणासाठी तरी शेवटचा ठरणार आहे.
advertisement
1/10
रितेश भाऊच्या धक्क्याआधीच आतली बातमी फुटली! दुसऱ्या आठवड्यात शॉकिंग एलिमिनेशन
'बिग बॉस मराठी ६' सुरू होऊन आता दोन आठवडे उलटले आहेत. पहिल्या आठवड्यात रितेश देशमुखने सर्वांना एक संधी दिली होती, पण यावेळचा भाऊचा धक्का मात्र कुणासाठी तरी शेवटचा ठरणार आहे.
advertisement
2/10
घरामध्ये राडे, प्रेमप्रकरणं आणि राजकारण रंगात आलेलं असतानाच, आता प्रेक्षकांनी आपला कौल दिला असून घराबाहेर जाणाऱ्या पहिल्या सदस्याचं नाव समोर येत आहे. या एलिमिनेशनने सोशल मीडियावर चाहत्यांची चांगलीच नाराजी पाहायला मिळतेय.
advertisement
3/10
या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी तब्बल नऊ जण नॉमिनेट झाले होते. यामध्ये सागर कारंडे, प्रभू शेळके, अनुश्री माने, दिव्या शिंदे, राधा पाटील, रोशन भजनकर, दिपाली सय्यद, करण सोनावणे आणि रुचिता जामदार यांचा समावेश होता.
advertisement
4/10
मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भचा रोशन भजनकर याला प्रेक्षकांनी भरभरून मतं देऊन नंबर वनवर ठेवलं आहे. दिव्या शिंदे आणि करण सोनावणे यांनीही आपल्या फॅन बेसच्या जोरावर स्वतःला सुरक्षित केलंय. चतुर आणि शांत खेळणाऱ्या सागर कारंडेलाही प्रेक्षकांनी पसंती दिली आहे.
advertisement
5/10
मात्र, खरा गेम रंगला आहे तो प्रभू शेळके, रुचिता जामदार आणि राधा पाटील यांच्यात! व्होटिंगच्या तळाला हे तीन स्पर्धक होते. प्रभू शेळकेबद्दल सोशल मीडियावर आधीच नकारात्मक चर्चा होती, तर रुचिता जामदार घरात असूनही फारशी दिसत नव्हती. पण सगळ्यात मोठा धक्का बसलाय तो राधा पाटील हिच्या चाहत्यांना.
advertisement
6/10
सोशल मीडियावरील चर्चा आणि लीक झालेल्या माहितीनुसार, राधा पाटील हिचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपल्याचं बोललं जात आहे. तिच्या डान्सवरून आणि वागण्यावरून घरात वाद झाले होते, पण ती इतक्या लवकर बाहेर पडेल असं कुणालाही वाटलं नव्हतं.
advertisement
7/10
या आठवड्यातील भाऊच्या धक्क्यामध्ये रितेश देशमुख अधिकृतपणे घराबाहेर होणाऱ्या स्पर्धकाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार आहे. राधा पाटीलच्या एलिमिनेशनची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर तिचे चाहते संताप व्यक्त करत आहेत.
advertisement
8/10
"तिच्यापेक्षा प्रभू शेळके किंवा रुचिता बाहेर जायला हवी होती," अशा कमेंट्सचा पूर आला आहे. अद्याप घराबाहेर होणाऱ्या स्पर्धकाच्या नावाची अधिकृत घोषणा झाली नसली, तरीही राधा घराबाहेर जाणार असल्याच्या बातमीने धुमाकूळ घातला आहे.
advertisement
9/10
राधाने पहिल्या दिवसापासून घरात आपल्या डान्सने आणि स्पष्टवक्तेपणाने जागा बनवण्याचा प्रयत्न केला होता, पण प्रेक्षकांचं गणित काहीतरी वेगळंच निघालं. जर राधा बाहेर पडली तर घरातील समीकरणं पूर्णपणे बदलणार आहेत.
advertisement
10/10
विशेषतः दीपाली सय्यद आणि राधा यांच्यातील कोल्ड वॉर आता थांबणार असलं तरी, नवीन गटबाजीला सुरुवात होईल. एका सदस्याचा पत्ता कट झाल्यामुळे आता उरलेले स्पर्धक आपला गेम प्लॅन बदलतात की अजून आक्रमक होतात, हे पाहणं रंजक ठरेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
BBM6: रितेश भाऊच्या धक्क्याआधीच आतली बातमी फुटली! दुसऱ्या आठवड्यात शॉकिंग एलिमिनेशन, कोणचा गेम ओव्हर?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल