कधी हुडहुडी, कधी घाम... बदलत्या वातावारणात जाम कोणता प्यावा? बिअर, रम की व्हिस्की; तुमची निवड ठरेल आरोग्यासाठी गेमचेंजर
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अशा बदलत्या वातावरणात शरीराचं तापमान सांभाळणं हे एक मोठं आव्हान असतं. आधीच शरीर वेगवेगळ्या परिस्थितीतून जात असतं त्यात कधी ड्रिंक करण्याचा प्लान झालाच, तर चुकीच्या दारुमुळे शरीरा आणखी त्रास सहन करावा लागतो. खरंतर या महत्वाच्या गोष्टीकडे अनेक लोक काना डोळा करतात.
advertisement
1/11

निसर्गाचं चक्र सध्या असं काही फिरलंय की सकाळी थंडी वाजतेय, दुपारी घाम फुटतोय आणि संध्याकाळी पुन्हा गुलाबी थंडीची लाट येतेय. यालाच आपण 'मिक्स वेदर' म्हणतो. अशा बदलत्या वातावरणात शरीराचं तापमान सांभाळणं हे एक मोठं आव्हान असतं. आधीच शरीर वेगवेगळ्या परिस्थीतून जात असतं त्यात कधी ड्रिंक करण्याचा प्लान झालाच, तर चुकीच्या दारुमुळे शरीरा आणखी त्रास सहन करावा लागतो. खरंतर या महत्वाच्या गोष्टीकडे अनेक लोक काना डोळा करतात.
advertisement
2/11
तसं पाहाता ड्रिंक करणे किंवा दारु पिणं आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि ते न पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पण असं असलं तरी देखील असे अनेक लोक आहेत, ज्यांना दारु लागतेच किंवा अगदी सुट्टी किंवा लाँग विकेंड आले की लोक दारु पितातच. अशात थोडी काळजी घेतली तर शरीराचं नुकसान कमी होईल.
advertisement
3/11
हा प्रश्न केवळ आवडीचा नाही, तर तो तुमच्या आरोग्याशी आणि शरीराच्या 'थर्मोरेग्युलेशन'शी जोडलेला आहे. तुम्ही घेतलेला एक चुकीचा निर्णय तुम्हाला दुसऱ्या दिवशी सर्दी-खोकल्याच्या विळख्यात ढकलू शकतो. चला तर मग, या बदलत्या वातावरणात कोणता 'जाम' तुमच्यासाठी बेस्ट ठरेल, याचा 'तथ्य'पूर्ण खुलासा करूया.
advertisement
4/11
1. चिल्ड बिअर (Beer): उन्हातली राणी, पण थंडीतली वैरी?जेव्हा दुपारी कडक ऊन पडतं, तेव्हा थंडगार बिअर मनाला शांती देते. बिअरमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ती 'हायड्रेटिंग' वाटते. पण सावधान! जर तुम्ही संध्याकाळी थंडी असताना बिअर पीत असाल, तर बिअरमधील 'डाययुरेटिक' गुणधर्मामुळे शरीरातील पाणी कमी होते आणि तुम्हाला जास्त थंडी वाजू शकते.
advertisement
5/11
कधी प्यावी: जर दुपारचं ऊन जास्त असेल आणि तुम्ही डिहायड्रेटेड नसाल, तर हलकी बिअर चालू शकते. पण रात्रीच्या थंडीत बिअर पिणं म्हणजे घशाला सूज (Sore Throat) येण्याला आमंत्रण देण्यासारखं आहे.
advertisement
6/11
2. ओल्ड मंक किंवा रम (Rum): थंडीचा खरा सोबतीभारतीय शौकिनांमध्ये रमचं स्थान अढळ आहे. रमला 'वार्मिंग ड्रिंक' मानलं जातं. रम प्यायल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. बदलत्या वातावरणात जेव्हा संध्याकाळी अचानक गारवा वाढतो, तेव्हा शरीराची प्रतिकारशक्ती कमी होण्याची शक्यता असते. अशा वेळी मर्यादित प्रमाणात रम आणि कोमट पाणी तुम्हाला सर्दीपासून वाचवू शकतं.
advertisement
7/11
कधी प्यावी: संध्याकाळी जेव्हा थंडीचा कडाका सुरू होतो, तेव्हा रमचा एक पेग तुमच्या रक्ताभिसरणाला गती देऊन उब निर्माण करतो. पण लक्षात ठेवा, अति प्रमाणात रम प्यायल्याने शरीर प्रमाणाबाहेर गरम होऊ शकतं, जे ताप येण्यास कारणीभूत ठरेल.
advertisement
8/11
3. व्हिस्की (Whiskey): क्लासिक आणि बॅलन्स्ड पर्याय?व्हिस्की हा असा प्रकार आहे जो कोणत्याही ऋतूत चालतो, असं म्हटलं जातं. व्हिस्की प्यायल्याने रक्तवाहिन्या किंचित विस्तारतात (Vasodilation), ज्यामुळे शरीरात तात्पुरती उब निर्माण होते. जर वातावरण सतत बदलत असेल, तर व्हिस्की आणि साधं पाणी (कोमट असल्यास उत्तम) हा एक संतुलित पर्याय ठरू शकतो.कधी प्यावी: रात्रीच्या जेवणानंतर जेव्हा वातावरणात अनिश्चितता असते, तेव्हा व्हिस्की शरीराला रिलॅक्स करण्यासाठी मदत करते.
advertisement
9/11
तज्ज्ञांचा 'कडू' पण खरा सल्लाविज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर, अल्कोहोल शरीराचं तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी करतं.1. पाणी महत्त्वाचे: तुम्ही कोणतीही ड्रिंक निवडा, सोबत मुबलक पाणी प्यायला विसरू नका. 'एक पेग, एक ग्लास पाणी' हे सूत्र पाळा. 2. कोमट पाण्याचा वापर: बदलत्या हवेत सोड्याऐवजी कोमट पाण्याचा वापर केल्यास घशाला संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. 3. प्रमाण महत्त्वाचे: वातावरण बदलतंय म्हणून जास्त पिणं म्हणजे आजाराला निमंत्रण देणं आहे.
advertisement
10/11
जर वातावरण 'कधी नरम, कधी गरम' असेल, तर व्हिस्की किंवा रम (कोमट पाण्यासोबत) हे बिअरपेक्षा जास्त सुरक्षित पर्याय मानले जातात. बिअरमुळे शरीराचं तापमान वेगाने खाली येऊ शकतं, जे या वातावरणात घातक ठरेल. त्यामुळे तुमच्या ग्लासात काय आहे, यापेक्षा तुम्ही ते कोणत्या वेळेला आणि वातावरणात पिताय, हे जास्त महत्त्वाचे आहे.
advertisement
11/11
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी मद्यपानासाठी प्रोत्साहन देत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
कधी हुडहुडी, कधी घाम... बदलत्या वातावारणात जाम कोणता प्यावा? बिअर, रम की व्हिस्की; तुमची निवड ठरेल आरोग्यासाठी गेमचेंजर