TRENDING:

फोटो काढताना कंट्रोल सुटला, वृद्धाने थेट मौनी रॉयच्या कंबरेतच घातला अन्... अभिनेत्रीनं सांगितला धक्कादायक प्रसंग

Last Updated:
अभिनेत्री मौनी रॉय चांगलीच संतापली आहे. इव्हेंटमध्ये तिच्याबरोबर नको ते कृत्य घडलं. अभिनेत्रीनं पोस्ट लिहित सगळं सांगितलं.
advertisement
1/7
फोटो काढताना कंट्रोल सुटला, वृद्धाने थेट मौनी रॉयच्या कंबरेतच घातला अन्...
सेलिब्रेटी म्हटलं की त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी होते. त्यातही खूपच फेमस कलाकार असेल तर गोष्टच वेगळी. काही दिवसांआधी अभिनेत्री समांथा एका इव्हेंटला गेली असता तिच्याबरोबर धक्काबुक्की करण्यात आली. तिला कसंबसं तिच्या कारमध्ये बसवण्यात आलं.
advertisement
2/7
दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉयबरोबर देखील एक धक्कादायक घटना घडली. एका कार्यक्रमा दरम्यान मौनी रॉयबरोबर एक विचित्र प्रसंग घडला. मौनीने सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट संपूर्ण प्रकार सांगितला.
advertisement
3/7
लोकप्रिय अभिनेत्री मौनी रॉय हरियाणातील करनाल येथे झालेल्या एका इव्हेंटला गेली होती. तिथला धक्कादायक अनुभव तिने पोस्टमध्ये सांगितला. ती म्हणाली, "काल करनालमध्ये एक इव्हेंट होता आणि तिथे काही लोकांच्या वागणुकीमुळे मी प्रचंड निराश झाले आहे. विशेषतः दोन अंकल ज्यांचं वय आजोबा होण्याचं आहे. इव्हेंट सुरू होताच ते आणि त्यांच्याबरोबर असलेले लोक स्टेजवर आले." 
advertisement
4/7
मौनीने पुढे लिहिलंय, "फोटो काढण्याच्या बहाण्याने काही पुरुषांनी तिच्या कंबरेवर हात ठेवला. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की सर, प्लीज हात काढा, पण त्यांना ते आवडलं नाही,"
advertisement
5/7
"स्टेजवर तर खूपच वाईट स्टोरी होती. दोन अंकल माझ्या समोर उभे होते आणि माझ्यावर घाणेरड्या कमेंट आणि इशारे करत होते. माझं नाव घेऊन हाक मारत होते. मी आधी त्यांना नम्रतेनं इशारा करत सांगितलं असं नका करू. त्यानंतर त्यांनी माझ्या अंगावर गुलाब फेकायला सुरुवात केली."
advertisement
6/7
"मी डान्स परफॉर्मन्स मध्येच सोडून जाण्याचा विचार केला. मी स्टेजच्या बाहेर गेले पण परत आले आणि परफॉर्मन्स पूर्ण केला. पण या सगळ्यात कोणीच त्यांना थांबवलं नाही."
advertisement
7/7
मौनी रॉयने सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत म्हटलं, "स्टेज उंचावर होता आणि अंकल लो अँगलने व्हिडीओ करत होते. त्यांनी कोणी थांबवलं तर ते त्यांना शिव्या देत होते. मी अपमानित आणि सदम्यात आहे आणि अधिकाऱ्यांनी या असहनीय वागण्यावर कारवाई करावी."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
फोटो काढताना कंट्रोल सुटला, वृद्धाने थेट मौनी रॉयच्या कंबरेतच घातला अन्... अभिनेत्रीनं सांगितला धक्कादायक प्रसंग
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल