TRENDING:

जीव गेला तरी चालेल जया एकादशीला चुकूनही करू नका ही 11 कामे, अन्यथा सोसावे लागतील हाल!

Last Updated:
माघ महिन्यातील शुद्ध पक्षातील एकादशी म्हणजेच 'जया एकादशी'. हिंदू धर्मात या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे व्रत केल्याने पिशाच योनीतून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे. मात्र, जया एकादशीचे पूर्ण फळ मिळवण्यासाठी शास्त्रात काही कडक नियम सांगितले आहेत.
advertisement
1/12
जीव गेला तरी चालेल जया एकादशीला चुकूनही करू नका ही 11 कामे
माघ महिन्यातील शुद्ध पक्षातील एकादशी म्हणजेच 'जया एकादशी'. हिंदू धर्मात या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे व्रत केल्याने पिशाच योनीतून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे. मात्र, जया एकादशीचे पूर्ण फळ मिळवण्यासाठी शास्त्रात काही कडक नियम सांगितले आहेत. जर तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल, तरी या दिवशी काही गोष्टी टाळणे अत्यंत गरजेचे आहे.
advertisement
2/12
भात खाणे वर्ज्य: एकादशीला भात खाणे हे सर्वात मोठे पाप मानले जाते. पौराणिक कथेनुसार, या दिवशी तांदळात 'काम' वास करत असतो, त्यामुळे भात खाल्ल्याने मन अशुद्ध होते.
advertisement
3/12
गाईला पोळी देऊ नका: अनेकांना वाटते की गाईला पोळी घालणे पुण्य आहे, पण एकादशीला गाईचाही उपवास असतो असे मानले जाते. त्यामुळे तिला अन्नाचा घास भरवून तिच्या उपवासात बाधा आणू नका.
advertisement
4/12
तुळशीची पाने तोडू नका: तुळशी माता भगवान विष्णूंना प्रिय आहे आणि ती या दिवशी विष्णूंसाठी निर्जला उपवास करते. त्यामुळे तिला स्पर्श करणे किंवा पाने तोडणे महापाप आहे.
advertisement
5/12
पांढऱ्या मिठाचा वापर टाळा: साधे समुद्री मीठ तामसिक मानले जाते. उपवासात केवळ 'सेंधव मिठाचा' वापर करावा.
advertisement
6/12
भांड्यांची निवड: एकादशीला पितळ किंवा काशाच्या भांड्यात जेवण करणे निषिद्ध आहे. या धातूंच्या भांड्यात अन्नावर विशिष्ट रासायनिक प्रक्रिया होऊन ते अशुद्ध होते.
advertisement
7/12
दशमीपासूनच पथ्य: एकादशीच्या एक दिवस आधी म्हणजेच दशमीला सूर्यास्तानंतर गहू, मूग आणि मीठ खाणे बंद करावे, जेणेकरून एकादशीला शरीर पूर्णपणे शुद्ध राहील.
advertisement
8/12
दिवसा झोपणे टाळा: एकादशीला दिवसा झोपल्याने व्रताचे पुण्य कमी होते. हा काळ "जागरणाचा" असून विष्णू नामाचा जप करण्यासाठी असतो.
advertisement
9/12
टूथपेस्टचा वापर करू नका: टूथपेस्टमध्ये अनेकदा अशुद्ध घटक किंवा रसायने असतात. त्याऐवजी कडुनिंबाची काडी किंवा फक्त पाण्याने गुळण्या करून तोंड स्वच्छ करावे.
advertisement
10/12
मोहरी आणि हिंग वर्ज्य: फोडणीसाठी वापरली जाणारी मोहरी आणि हिंग हे दोन्ही पदार्थ एकादशीच्या दिवशी खाऊ नयेत, कारण ते शरीरात उष्णता आणि तामसिक विचार निर्माण करतात.
advertisement
11/12
केस आणि नखे कापू नका: या दिवशी क्षौरकर्म किंवा नखे कापणे अशुभ मानले जाते. तसेच डोक्यावरून पाणी घेऊन केस धुणे देखील टाळावे.
advertisement
12/12
घर झाडू नका: घर झाडताना लहान कीटक किंवा मुंग्यांची हत्या होण्याची शक्यता असते. एकादशीला कोणत्याही जिवाची हिंसा होऊ नये, म्हणून झाडलोट टाळली जाते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
जीव गेला तरी चालेल जया एकादशीला चुकूनही करू नका ही 11 कामे, अन्यथा सोसावे लागतील हाल!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल