महाराष्ट्राचे धुरंधर देशाला वेड लावणार! 1-2 नाही, तर The 50 मध्ये दिसणार 'बिग बॉस मराठी' चे 4 चेहरे, कोण आहे ते?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
The 50 Show Contestants: संपूर्ण देशात चर्चा असणाऱ्या या शोमध्ये आपल्या महाराष्ट्राचे लाडके चेहरेही शड्डू ठोकून उभे ठाकणार आहेत.
advertisement
1/7

भारतीय रिअॅलिटी शोच्या इतिहासात आतापर्यंतचा सर्वात मोठा धमाका व्हायला आता अवघे काही दिवस उरले आहेत. 'बिग बॉस' आणि 'खतरों के खिलाडी' विसरा, कारण आता येतोय 'The 50'!
advertisement
2/7
कलर्स टीव्ही आणि जिओ सिनेमावर सुरू होणाऱ्या या शोने सध्या सोशल मीडियावर आग लावली आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण देशात चर्चा असणाऱ्या या शोमध्ये आपल्या महाराष्ट्राचे लाडके चेहरेही शड्डू ठोकून उभे ठाकणार आहेत.
advertisement
3/7
मराठी मनावर राज्य करणारा आणि 'बिग बॉस १६' मध्ये आपली ताकद दाखवणारा शिव ठाकरे आता 'The 50' मध्ये आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतंच शिवने प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं आणि या नव्या प्रवासाची अधिकृत घोषणा केली.
advertisement
4/7
शिव म्हणाला, "हा खेळ फक्त शारीरिक ताकदीचा नाही, तर मानसिक धैर्याचा आहे. ५० जणांच्या गर्दीत स्वतःची जागा निर्माण करणं हे खरं आव्हान असेल." शिवच्या या एन्ट्रीमुळे मराठी चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
advertisement
5/7
'बिग बॉस मराठी ५' मध्ये आपल्या तिखट स्वभावाने आणि आक्रमक खेळाने चर्चेत राहिलेली जान्हवी किल्लेकर आता पुन्हा एकदा रिअॅलिटी शोच्या रिंगणात उतरणार आहे. जान्हवीची स्टाईल आणि तिची फायर या शोमध्ये काय कमाल करते, हे पाहणं रंजक ठरेल. शिव आणि जान्हवी हे दोन तगडे मराठी स्पर्धक ५० जणांच्या या फौजेत सामील झाल्यामुळे, महाराष्ट्राचा डंका नक्कीच वाजणार आहे.
advertisement
6/7
हा शो परदेशातील गाजलेल्या फॉरमॅटवर आधारित आहे. ५० स्पर्धक, एक भव्य महाल आणि समोर उभं ठाकलेलं 'द लायन' नावाचं एक रहस्यमयी पात्र! यामध्ये टीव्ही विश्वातील करण पटेल, कोमोलिका फेम उर्वशी ढोलकिया, रिद्धी डोगरा, दिव्या अग्रवाल आणि सोशल मीडिया स्टार मिस्टर फैसू यांसारखी दिग्गज नावं आहेत. इतकंच नाही, तर 'बिग बॉस मराठी ५' मधील चर्चेत आलेली जोडी निक्की तांबोळी आणि अरबाज शेख हे देखील या राड्यात सहभागी होणार आहेत.
advertisement
7/7
१ फेब्रुवारी २०२६ पासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शारीरिक कसरती आणि मानसिक राजकारण यांचा असा संगम याआधी कधीच पाहायला मिळाला नव्हता. एका बाजूला ५० स्पर्धकांचा ताफा आणि दुसऱ्या बाजूला गुंतागुंतीचे टास्क, यामुळे हा शो टीआरपीचे सर्व रेकॉर्ड मोडेल असं बोललं जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
महाराष्ट्राचे धुरंधर देशाला वेड लावणार! 1-2 नाही, तर The 50 मध्ये दिसणार 'बिग बॉस मराठी' चे 4 चेहरे, कोण आहे ते?