'मुलासाठी बापही हवा!' 4 वर्षात मोडलं पहिलं लग्न, बिग बॉसमध्ये झाली बॉयफ्रेंडची पोलखोल; 40 व्या वर्षी अभिनेत्री चढणार बोहोल्यावर?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Rashmi Desai: अभिनेता नंदीश संधूशी झालेला घटस्फोट आणि त्यानंतर 'बिग बॉस'मध्ये अरहान खानची झालेली पोलखोल, यातून सावरल्यानंतर आता रश्मीने आपल्या आयुष्यातील एका नवीन सुरुवातीबद्दल संकेत दिले आहेत.
advertisement
1/7

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री बिग बॉस फेम रश्मी देसाई सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रश्मीचं प्रोफेशनल आयुष्य जेवढं यशस्वी राहिलं, तेवढंच तिचं खाजगी आयुष्य नेहमीच चढ-उतारांनी भरलेलं होतं.
advertisement
2/7
अभिनेता नंदीश संधूशी झालेला घटस्फोट आणि त्यानंतर 'बिग बॉस'मध्ये अरहान खानची झालेली पोलखोल, यातून सावरल्यानंतर आता रश्मीने आपल्या आयुष्यातील एका नवीन सुरुवातीबद्दल संकेत दिले आहेत. २०२६ हे वर्ष रश्मी काहीतरी गोड बातमी घेऊन येणार असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत.
advertisement
3/7
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रश्मीने आपल्या लग्नाच्या प्लॅनिंगवर मोकळेपणाने भाष्य केलं. रश्मी म्हणते, "लग्न माझ्या डोक्यात आहे आणि जर मला योग्य जोडीदार मिळाला, तर मी नक्कीच पुन्हा संसार थाटेन. २०२६ हे वर्ष अत्यंत शुभ वर्ष आहे. मला आशा आहे की या वर्षात माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडेल. जर लग्नाचा योग जुळून आला, तर मी स्वतःहून ही आनंदाची बातमी चाहत्यांशी शेअर करेन."
advertisement
4/7
लग्न आणि नात्यांच्या पलीकडे जाऊन रश्मीने आई होण्यावरही आपलं रोखठोक मत मांडलं. रश्मीला मूल हवं आहे, पण त्यासाठी तिने एक स्पष्ट भूमिका घेतली आहे. ती म्हणते, "मला आई व्हायला नक्कीच आवडेल, मग ते मूल दत्तक असो वा माझं स्वतःचं. पण, माझ्या मुलाला बाप असावा, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मी 'अर्धनारीश्वर' संकल्पनेवर विश्वास ठेवते, जिथे स्त्री आणि पुरुष दोन्ही ऊर्जा एकत्र असतात. त्यामुळे मी लग्नानंतरच आई होण्याचा विचार करेन."
advertisement
5/7
रश्मीचं पहिलं लग्न तिचा 'उतरन' मधील को-स्टार नंदीश संधूशी २०१२ मध्ये झालं होतं. मात्र, हे नातं फार काळ टिकलं नाही आणि २०१६ मध्ये त्यांचा अधिकृत घटस्फोट झाला.
advertisement
6/7
त्यानंतर 'बिग बॉस १३' मध्ये अरहान खानसोबतचं तिचं नातं जगजाहीर झालं, पण तिथेही तिची फसवणूक झाल्याचं समोर आल्यावर तिने ते नातं संपवलं. तेव्हापासून रश्मी सिंगल आहे आणि आता पुन्हा एकदा प्रेमावर विश्वास ठेवून नवीन सुरुवात करण्यास ती सज्ज झाली आहे.
advertisement
7/7
रश्मी देसाईने आपल्या करिअरची सुरुवात 'रावण' या मालिकेतून केली होती. पण खऱ्या अर्थाने तिला लोकप्रियता मिळाली ती 'उतरन'मधील तपस्या या भूमिकेमुळे. त्यानंतर 'झलक दिखला जा', 'नच बलिये' आणि 'बिग बॉस' यांसारख्या मोठ्या रिअॅलिटी शोमध्ये ती झळकली. आज रश्मी टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'मुलासाठी बापही हवा!' 4 वर्षात मोडलं पहिलं लग्न, बिग बॉसमध्ये झाली बॉयफ्रेंडची पोलखोल; 40 व्या वर्षी अभिनेत्री चढणार बोहोल्यावर?