TRENDING:

आईची डिट्टो कॉपी आहे मेने प्यार कियाच्या भाग्यश्रीची लेक, OTT च्या थ्रीलर सीरिजमध्ये केलंय काम

Last Updated:
सलमान खानच्या मेंने प्यार कियाची भाग्यश्री आजही सर्वांची फेव्हरेट आहे. तिच्या मुलीला पाहिलंय का? तिने ओटीटीच्या थ्रीलर सीरिजमध्ये काम केलं आहे.
advertisement
1/8
आईची डिट्टो कॉपी आहे मेने प्यार कियाच्या भाग्यश्रीची लेक
मैंने प्यार कियाची भाग्यश्री आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. एकच सिनेमा करून भाग्यश्रीनं जे फेम मिळवलं ते आज 30 वर्षांनंतरही कायम आहे. भाग्यश्रीच्या सौंदर्यावर आजही तिचे चाहते फिदा आहेत. पण तुम्ही भाग्यश्रीच्या मुलीला पाहिलं आहे का? 
advertisement
2/8
भाग्यश्रीची मुलगी अवंतिका दसानी हिचा नुकताच बर्थडे झाला. अवंतिका देखील एक अभिनेत्री आहे. अवंतिका 31 वर्षांची झाली. या प्रसंगी तिची आई भाग्यश्रीने अनेक अनसीन फोटो शेअर केलेत.  अवंतिकाच्या बालपणीचे फोटो देखील भाग्यश्रीनं शेअर केलेत.
advertisement
3/8
भाग्यश्रीने तिची मुलगी अवंतिका दसानीला 31 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिच्यावर आशीर्वाद आणि प्रेमाचा वर्षाव केला. तिने तिच्या मुलीसाठी इमोशनल पोस्टही लिहिली. 
advertisement
4/8
एका फोटोत आई-मुलीची जोडी एका सुंदर पारंपारिक साडीत दिसत आहे. दुसऱ्या फोटोत अवंतिकाचा बालपणीचा फोटो दिसतोय. तर आणखी एका फोटोमध्ये अवंतिकाचा ग्लॅमरस लूकमध्ये दिसतोय.
advertisement
5/8
भाग्यश्रीनं पोस्टमध्ये लिहिलंय, "ज्या क्षणापासून मी तुला माझ्या हातात घेतलं तेव्हापासून मला कळलं की माझं जग बदललं आहे. माझ्या हृदयाचा तो तुकडा जो माझ्या बाहेर राहत, पण नेहमीच माझा आहे. तू माझी मुलगी आहेस पण कधीकधी तू मला आईसारखी उचलून धरतेस जसं मी तुला धरलं होतं. तू माझा श्वास आहेस माय सनशाइन. माय ऑक्सिटोसिन."
advertisement
6/8
भाग्यश्रीने पुढे लिहिले, "...आणि मी कधीही तुझी पुरेपूर काळजी घेऊ शकत नाही. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे माझं पिल्लू, माझा चिपमंक, माझा टॉमबॉय, माझी सुंदर बाहुली, माझा योद्धा, माझा मित्र आणि मुलगी, सर्व एकाच ठिकाणी. देवाचे आशीर्वाद तुझ्यावर कायम राहावे."
advertisement
7/8
अवंतिका देखील आईच्या पाऊलावर पाऊल ठेवून चालत आहे. 2022 मध्ये तिने 'मिथ्या' या सायकॉलॉजिकल थ्रिलर-ड्रामा वेब सिरीजमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या सीरिजमध्ये तिनं हुमा कुरेशीसोबत काम केलं. डेब्यू वेब सीरिजमध्येच अवंतिकाच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. त्यानंतर अवंतिकाने 'नेनु स्टुडंट सर' या तेलुगू सिनेमात काम केलं पण हा सिनेमा फ्लॉप झाला. 'इन गल्ली में' या सिनेमातही ती दिसली. जावेद जाफरी यांच्यासोबत ती दिसली. 
advertisement
8/8
भाग्यश्री तिच्या काळात एक लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री होती. तिचा 'मैने प्यार किया' या सिनेमा काम केलं. सलमान खानची हिरोईन बनून एका रात्रीत स्टार झाली. या वर्षी ती "राजा शिवाजी" या सिनेमात दिसणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
आईची डिट्टो कॉपी आहे मेने प्यार कियाच्या भाग्यश्रीची लेक, OTT च्या थ्रीलर सीरिजमध्ये केलंय काम
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल