TRENDING:

'रोजच्या किचकिचपेक्षा...', सोहेल खानपासून वेगळं झाल्यानंतर सीमा सजदेहचं शॉकिंग स्टेटमेंट, पहिल्यांदाच सांगितली 'ती' गोष्ट

Last Updated:
बॉलीवूडचा 'भाईजान' सलमान खानच्या वहिनीचं स्टेटमेंट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय.
advertisement
1/6
सोहेल खानपासून वेगळं झाल्यानंतर सीमा सजदेहचं शॉकिंग स्टेटमेंट
बॉलीवूडचा 'भाईजान' सलमान खानच्या वहिनीचं स्टेटमेंट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय. अभिनेता सोहेल खान आणि त्याची एक्स वाइफ सीमा सजदेह यांच्या घटस्फोटाला आता काही काळ उलटला आहे.
advertisement
2/6
१९९८ मध्ये पळून जाऊन लग्न केलेल्या या जोडीने २०२२ मध्ये अधिकृतपणे घटस्फोट घेत सर्वांना धक्का दिला होता. आता इतक्या वर्षांनंतर सीमा सजदेहने गप्प न राहता, खान कुटुंबाची सून म्हणून घालवलेले दिवस आणि सोहेलसोबतच्या नात्याचा शेवट का झाला, यावर खळबळजनक खुलासा केला आहे.
advertisement
3/6
सीमा सजदेहने एका मुलाखतीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. ती म्हणते, "जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा मी फक्त २२ वर्षांची होते. आम्ही दोघंही खूप लहान होतो. काळ बदलला तशी माणसं बदलतात आणि विचारांची दिशाही. जसे आम्ही मोठे झालो, तसं आम्हाला जाणवलं की आमची मतं जुळत नाहीत. शेवटी एका वळणावर आम्हाला समजलं की, आम्ही पती-पत्नी होण्यापेक्षा चांगले मित्र म्हणून जास्त काळ एकत्र राहू शकतो."
advertisement
4/6
घटस्फोटाचा निर्णय हा एका रात्रीत घेतलेला नव्हता. सीमाच्या मते, घरात सतत होणारी किचकिच आणि वाद मुलांच्या मानसिकतेवर परिणाम करत होते. "रोजच्या भांडणापेक्षा शांततेत वेगळं होणं कधीही चांगलं. आम्हाला घरचं वातावरण खराब करायचं नव्हतं. म्हणूनच आम्ही विचारपूर्वक वेगळं होण्याचा निर्णय घेतला. सोहेल माझ्या मुलांचा बाप आहे आणि ते नातं कधीच बदलणार नाही. आजही आम्ही एक कुटुंब म्हणूनच वागतो," असंही तिने स्पष्ट केलं.
advertisement
5/6
घटस्फोटानंतरचं आयुष्य सीमासाठी सोपं नव्हतं. खान कुटुंबातून बाहेर पडल्यानंतर तिला अनेक संकटांचा सामना करावा लागला. सीमा सांगते, "मी डिप्रेशनमध्ये गेले होते. एकटी राहिल्यावर मला फायनान्स, मेडिकल इन्शुरन्स, बिले भरणे या गोष्टी शून्यातून शिकाव्या लागल्या. आता मला माझ्या व्यवसायाकडे लक्ष द्यायचंय आणि आपल्या पायावर उभं राहून मुलांचा सांभाळ करायचा आहे."
advertisement
6/6
सोहेल खानशी लग्न करण्यापूर्वी सीमाची एंगेजमेंट विक्रम आहुजा यांच्याशी झाली होती. पण सोहेलसाठी तिने तेव्हा ते नातं तोडलं होतं. मात्र आता इतक्या वर्षांनंतर, सोहेलशी घटस्फोट घेतल्यावर आता सीमा पुन्हा एकदा विक्रम आहुजा यांना डेट करत आहे. जुनं प्रेम पुन्हा तिच्या आयुष्यात परतल्याने ती सध्या आनंदी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'रोजच्या किचकिचपेक्षा...', सोहेल खानपासून वेगळं झाल्यानंतर सीमा सजदेहचं शॉकिंग स्टेटमेंट, पहिल्यांदाच सांगितली 'ती' गोष्ट
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल