TRENDING:

AI तंत्रज्ञानावर आधारित कांदा वाण, शेतकऱ्यांच्या उत्पादनात होणार मोठी वाढ, कशी कराल शेती?

Last Updated:

. या नव्या तंत्रज्ञानामुळे कांदा उत्पादनात वाढ, खर्चात बचत आणि शेतकऱ्यांच्या नफ्यात लक्षणीय वाढ होणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : भारतातील सर्वात मोठ्या प्रत्यक्ष प्रात्यक्षिक असलेल्या कृषी प्रदर्शनात यंदा शेतीतील अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित या कृषी प्रदर्शनात कांदा पिकाच्या उत्पादनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सादर करण्यात आला. या नव्या तंत्रज्ञानामुळे कांदा उत्पादनात वाढ, खर्चात बचत आणि शेतकऱ्यांच्या नफ्यात लक्षणीय वाढ होणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
advertisement

या प्रदर्शनात सादर करण्यात आलेला F1 हायब्रिड कांद्याचा वाण कमी दिवसांचा असून लवकर परिपक्व होणारा आहे. पुनर्लागवड केल्यानंतर अवघ्या 85 ते 90 दिवसांत हा कांदा काढणीस तयार होतो. गोल ते सपाट गोल आकार, आकर्षक आणि चमकदार गडद लाल रंगाची साल आणि मजबूत कंद ही या वाणाची वैशिष्ट्ये आहेत. बारीक मान असल्यामुळे या कांद्याची साठवण क्षमता उत्तम असून योग्य साठवणीत तो दीर्घकाळ टिकतो. या वाणापासून प्रति एकर 25 ते 50 टनांपर्यंत उत्पादन मिळू शकते.

advertisement

Success Story : मोहगणीच्या झाडात घेतलं आंतरपीक, उत्पन्न मिळणार आता तीन पट, कसा केला प्रयोग यशस्वी? Video

याशिवाय नेदरलँड तंत्रज्ञानावर आधारित माल्बेक एफ 1 हा संकरित लाल कांद्याचा वाणही प्रदर्शनात विशेष आकर्षण ठरला. हा मध्यम कमी दिवसांचा वाण असून लावणीनंतर 60 ते 90 दिवसांत परिपक्व होतो. गडद लाल रंग, किंचित चपटा गोलाकार आकार, मजबूत पाने आणि बारीक मान ही त्याची ओळख आहे. डाऊनी मिल्ड्यूसारख्या बुरशीजन्य रोगांना सहनशील असल्यामुळे रोगप्रतिकारक्षमता या वाणात अधिक आहे. हा कांदा उपयुक्त असून साठवण क्षमता सुमारे सहा महिन्यांपर्यंत आहे. उन्हाळी आणि  पावसाळी दोन्ही हंगामांसाठी हा वाण अनुकूल असून विविध भौगोलिक प्रदेशांत यशस्वी ठरत आहे. या वाणाचेही उत्पादन 25 ते 50 टन प्रति एकर इतके अपेक्षित आहे.

advertisement

एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने मातीचा प्रकार, हवामान, पाण्याचे नियोजन, खत व्यवस्थापन आणि रोग नियंत्रण यांचे अचूक विश्लेषण केले जाते. त्यामुळे कांद्याचे सरासरी वजन 160 ते 200 ग्रॅमपर्यंत वाढते, मानेचा घेर सुमारे 0.8 इंच राहतो आणि पातीची उंची सुमारे 1.11 इंच इतकी संतुलित मिळते. या तंत्रज्ञानामुळे प्रति एकर 20 ते 22 टनांपर्यंत दर्जेदार उत्पन्न मिळण्याची शक्यता असल्याची माहिती साहिल मोरे यांनी दिली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
AI तंत्रज्ञानावर आधारित कांदा वाण, उत्पादनात होणार वाढ, कशी कराल शेती?
सर्व पहा

एआय आधारित कांदा उत्पादन तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना कमी कालावधीत अधिक उत्पादन, चांगला दर आणि टिकाऊ साठवण क्षमता मिळणार असून भविष्यात कांदा शेतीला चांगला फायदा मिळेल, असा विश्वास कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

मराठी बातम्या/कृषी/
AI तंत्रज्ञानावर आधारित कांदा वाण, शेतकऱ्यांच्या उत्पादनात होणार मोठी वाढ, कशी कराल शेती?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल