advertisement

APMC Market Rate: डाळिंबाच्या दरात तेजी कायम, गुळ आणि आल्याला काय मिळाला भाव? इथं चेक करा

Last Updated:

शुक्रवार, दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये आले, शेवगा आणि डाळिंबाची आवक आणि भाव पाहू.

+
APMC

APMC Market Rate: डाळिंबाच्या दरात तेजी कायम, गुळ आणि आल्याला काय मिळाला भाव? इथं चेक करा

मुंबई: शुक्रवार, दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये आले, शेवगा आणि डाळिंबाची आवक आणि भाव पाहू.
आल्याच्या आवकेत सुधारणा: राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 2310 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये सर्वाधिक 1217 क्विंटल आल्याची आवक झाली. त्यास प्रतीनुसार 4000 ते 6000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच चंद्रपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 12 क्विंटल आल्यास 5800 रुपये सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
शेवग्याचे दर स्थिर: राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 258 क्विंटल शेवग्याची आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये सर्वाधिक 122 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 6000 ते 9000 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच अहिल्यानगर मार्केटमध्ये आवक झालेल्या 3 क्विंटल शेवग्यास 8000 ते 10000 रुपये दरम्यान सर्वात जास्त बाजारभाव मिळाला.
advertisement
डाळिंबाच्या दरात चढ-उतार: आज राज्याच्या मार्केटमध्ये 2082 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी 915 क्विंटल सर्वाधिक आवक नागपूर मार्केटमध्ये राहिली. त्यास सर्वसाधारण 2000 ते 6000 रुपये दरम्यान सर्वात कमी बाजारभाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 886 क्विंटल डाळिंबास 12500 रुपये सर्वात जास्त बाजारभाव मिळाला.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
APMC Market Rate: डाळिंबाच्या दरात तेजी कायम, गुळ आणि आल्याला काय मिळाला भाव? इथं चेक करा
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement