Oscar 2026 मध्ये महिलांनी मारली बाजी! 'वन बॅटल आफ्टर अनदर' ठरली सर्वोत्कृष्ट फिल्म, भारताच्या हाती काय?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
मनोरंजन क्षेत्रातील नामांकीत समजला जाणारा ऑस्कर 2026 हा अवॉर्ड नुकताच जाहीर झाला आहे. हॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित 98 वा अकादमी पुरस्कार सोहळा यावर्षीही भव्य शैलीत पार पडला.
मनोरंजन क्षेत्रातील नामांकीत समजला जाणारा ऑस्कर 2026 हा अवॉर्ड नुकताच जाहीर झाला आहे. हॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित 98 वा अकादमी पुरस्कार सोहळा यावर्षीही भव्य शैलीत पार पडला. नेहमीप्रमाणे या वर्षीचा पुरस्कार सोहळा लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. या समारंभात जगातील सर्वोत्तम चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेते आणि तंत्रज्ञांना त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी सन्मानित करण्यात आले.
advertisement
'वन बॅटल आफ्टर अदर' ने ऑस्करमध्ये मोठा विजय मिळवला. चित्रपटाला अनेक श्रेणींमध्ये पुरस्कार मिळाले. 'वन बॅटल आफ्टर अदर' ने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकला. ऑस्करच्या रेड कार्पेटवर फॅशन आणि ग्लॅमरचाही झगमगाट होता. बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा तिचा पती निक जोनाससह पुरस्कार देण्यासाठी पोहोचली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
'मिस्टर नोबडी अगेन्स्ट पुतिन'ला सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी ऑस्कर मिळाला. टीमला पुरस्कार स्वीकारताना पाहिले जाऊ शकते. अकादमीने इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. सर्वोत्कृष्ट ध्वनीसाठीचा ऑस्कर F1 ला गेला, ज्याच्या साउंडट्रॅकने जगभरात प्रशंसा मिळवली. 'F1' हा ब्रॅड पिट अभिनीत अमेरिकन स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
98 व्या ऑस्कर पुरस्कारासाठी नीरज घेवान दिग्दर्शित Homebound हा सिनेमा भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून सादर करण्यात आला होता. 'सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिचर फिल्म' या श्रेणीत तो 15 व्या स्थानापर्यंत पोहोचला पण अखेरच्या नॉमिनेशनपर्यंत पोहोचू शकला नाही. या कॅटेगिरीमध्ये नॉर्वेजियन Sentimental Value ला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिचर फिल्म'चा पुरस्कार मिळाला.







