advertisement

PAK vs BAN : 15 सेकंदांचा नियम मोडला? पाकिस्तानने ICC कडे केली अधिकृत तक्रार

Last Updated:

Pakistan vs Bangladesh 3rd ODI DRS controversy : पाकिस्तानचा असा दावा आहे की, 50 व्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर अंपायरने वाईड दिल्यानंतर बांगलादेशने रिव्ह्यू घेण्यासाठी 15 सेकंदांची वेळ ओलांडली होती.

Pakistan vs bangladesh 3rd odi icc complaint drs controversy
Pakistan vs bangladesh 3rd odi icc complaint drs controversy
Pakistan vs Bangladesh 3rd ODI : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. ढाका येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे मॅचमध्ये 11 धावांनी पराभव स्वीकारावा लागल्याने पाकिस्तानने 3 सामन्यांती मालिका 2-1 ने गमावली आहे. मात्र, बांगलादेशविरुद्घचा पराभव पाकिस्तानी टीमच्या जिव्हारी लागला असून त्यांनी आता अंपायरिंगच्या निर्णयावर अधिकृत तक्रार नोंदवली आहे. 50 व्या ओव्हरमध्ये झालेल्या ड्रामानंतर पाकिस्तानने थेट अंपायरवर पराभवाचं खापर फोडलं आहे.

15 सेकंदांची वेळ ओलांडली?

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानचा असा दावा आहे की, 50 व्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर अंपायरने वाईड दिल्यानंतर बांगलादेशने रिव्ह्यू घेण्यासाठी 15 सेकंदांची वेळ ओलांडली होती. मोठ्या स्क्रीनवर रिप्ले पाहिल्यानंतरच बांगलादेशने रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. आयसीसीच्या नियमानुसार, 15 सेकंद संपण्यापूर्वीच कॅप्टनला रिव्ह्यूचा निर्णय घ्यावा लागतो, जो इथं पाळला गेला नाही, असं पाकिस्तानचं म्हणणं आहे. तसेच पाकिस्तानचा मुख्य आरोप असा आहे की बांगलादेशने बिग स्क्रीनवर रिप्ले पाहिल्यानंतर रिव्ह्यू घेतला. मात्र, पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनमध्ये शाहीन काहीही बोलला नव्हता.
advertisement

पराभव जिव्हारी लागणारा असला तरी...

पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनमध्ये शाहीन आफ्रिदी अंपायरच्या निर्णयावर काहीही बोलला नाही. शेवटच्या क्षणी मी प्रयत्न करणं माझं कामच होतं, पण रिशाद हुसेनने खरोखरच अप्रतिम बॉलिंग केली. तो एक उत्तम लेगस्पिनर आहे. बांगलादेशच्या टीमने आज खरोखरच चांगला खेळ केला आणि मी त्यांचे अभिनंदन करतो, असंही शाहीन शाह आफ्रिदी यावेळी म्हणाला. जरी हा पराभव जिव्हारी लागणारा असला तरी, यातून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. आगामी सामन्यांमध्ये क्षेत्ररक्षण, बॅटिंग आणि बॉलिंग या तिन्ही विभागांत अधिक सुधारणा करण्यावर टीमचा भर असेल, असंही शाहीन आफ्रिदी मॅच संपल्यावर म्हणाला होता.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Cricket and Meme (@cricbuzz.vk)



advertisement

आयसीसीचा नियम काय सांगतो?

बॉल 'डेड' झाल्यापासून केवळ 15 सेकंदांच्या आत खेळाडूला रिव्ह्यूची मागणी करावी लागते. या वेळेनंतर केलेली कोणतीही विनंती अंपायर स्वीकारू शकत नाहीत. 10 सेकंद उलटूनही जर खेळाडूने निर्णय घेतला नसेल, तर बॉलरच्या बाजूचे अंपायर खेळाडूला याची आठवण करून देतात. या सूचनेनंतर खेळाडूला त्वरित आपला निर्णय कळवावा लागतो. जर ऑन-फील्ड अंपायरना असे वाटले की खेळाडूने 15 सेकंदांची वेळ संपल्यानंतर रिव्ह्यू मागितला आहे, तर ते सरळपणे 'प्लेअर रिव्ह्यू'ची विनंती फेटाळून लावू शकतात.
advertisement

सलमान अली आगाचं तोंडभरून कौतुक

दरम्यान, शाहीनने यावेळी सलमान अली आगा याचं कौतुक देखील केलं होतं. सलमान हा टेस्ट आणि वनडे फॉरमॅटमधील एक दर्जेदार खेळाडू आहे. मिडल ऑर्डरमध्ये तो नेहमीच चांगली कामगिरी करतो. स्पिन आणि फास्ट बॉलिंग या दोन्हीवर त्याचे उत्तम नियंत्रण आहे. त्याने पाकिस्तानसाठी खेळलेली ही खेळी प्रदीर्घ काळ लक्षात राहील, असं शाहीन शाह आफ्रिदी म्हणाला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PAK vs BAN : 15 सेकंदांचा नियम मोडला? पाकिस्तानने ICC कडे केली अधिकृत तक्रार
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement