advertisement

PAK vs BAN : शेवटच्या ओव्हरमध्ये ड्रामा! 2 बॉलमध्ये 12 रन्स अन् DRS ने आणला ट्विस्ट; शाहीनला संताप अनावर, काय घडलं?

Last Updated:

PAK vs BAN Drama in the Final : रिशाद हुसेन आणि विकेटकीपर लिटन दास यांना खात्री होती की बॉल बॅटला लागला आहे. अंपायरने वाईड दिल्यानंतर बांगलादेशने तातडीने रिव्ह्यू घेण्याचा धाडसी निर्णय घेतला.

PAK vs BAN Drama in the Final Over DRS Brings Twist
PAK vs BAN Drama in the Final Over DRS Brings Twist
Pakistan vs Bangaladesh : पाकिस्तान आणि बांगलादेश मॅचमध्ये मोठा राडा पहायला मिळाला. मॅचच्या शेवटच्या ओव्हरमध्ये मैदानावर कमालीचा तणाव होता आणि पाकिस्तानला विजयासाठी शेवटच्या बॉल्सवर धावांची गरज होती. बांगलादेशचा स्पिनर रिशाद हुसेन 50 व्या ओव्हरमध्ये बॉलिंग करत होता, तर समोर शाहिन आफ्रिदी बॅटिंगसाठी सज्ज होता. ओव्हरचा पाचवा बॉल रिशादने टाकलेला हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर गेला, ज्यावर अंपायर कुमार धर्मसेना यांनी वाईडचा इशारा दिला. मात्र, या एका निर्णयाने मॅचमध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झाला. बांगलादेशने यावेळी एक धाडसी निर्णय घेतला.

बांगलादेशने तातडीने रिव्ह्यू घेतला

खरं तर, रिशाद हुसेन आणि विकेटकीपर लिटन दास यांना खात्री होती की बॉल बॅटला लागला आहे. अंपायरने वाईड दिल्यानंतर बांगलादेशने तातडीने रिव्ह्यू घेण्याचा धाडसी निर्णय घेतला. विशेष म्हणजे, अशा परिस्थितीत वाईडसाठी रिव्ह्यू घेता येतो का, याबाबत मैदानावर चर्चा सुरू झाली. पण बांगलादेशने घेतलेला हा रिव्ह्यू अखेर गेमचेंजर ठरला. थर्ड अंपायरने अल्ट्राएज (UltraEdge) तपासले असता, जेव्हा बॉल बॅटच्या जवळून जात होता, तेव्हा स्पष्ट स्पाइक दिसून आला.
advertisement

पाहा Video

advertisement

बॅटच्या टोकाला घासून गेला बॉल

बॉल विकेटकीपरने पकडला नाही त्यामुळे शाहिनची विकेट गेली नाही. शाहिन आफ्रिदीने लेग स्टंपच्या बाहेर सरकून मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण बॉल त्याच्या बॅटच्या टोकाला घासून गेला होता. हा पुरावा पाहिल्यानंतर अंपायर धर्मसेना यांना आपला निर्णय बदलावा लागला. या निर्णयानंतर पाकिस्तानला पराभव निश्चित झाला.
advertisement

शाहिन आफ्रिदी निर्णयावर नाराज

दरम्यान, या निर्णयामुळे पाकिस्तानला मिळणारी एक्स्ट्रा धाव तर रद्द झालीच, शिवाय तो बॉल 'लीगल डिलिव्हरी' म्हणून गणला गेला. लिटन दासच्या चपळाईमुळे आणि अचूक रिव्ह्यूमुळे बांगलादेशने मॅचवर आपली पकड मजबूत केली. शाहिन आफ्रिदी या निर्णयावर नाराज दिसला, पण नियमानुसार त्याला गप्प बसावं लागलं आणि पाकिस्तानला वनडे सीरिज गमावावी लागली आहे. सलमान आली आगाच्या शतकीय खेळीनंतर देखील पाकिस्तानला विजय मिळवता आला नाही.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PAK vs BAN : शेवटच्या ओव्हरमध्ये ड्रामा! 2 बॉलमध्ये 12 रन्स अन् DRS ने आणला ट्विस्ट; शाहीनला संताप अनावर, काय घडलं?
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement