चेक बाउंस झाल्याने तुमच्या सिबिल स्कोअरवरही परिणाम होतो? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
चेक बाउंस होणे हा प्रकार अनेकांसोबत होतो. पण याचा परिणाम आपल्या सिबिल स्कोअरवर होतो का? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर आज आपण महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत.
आपल्या रोजच्या जीवनात आपण कधीना कधी चेकचा वापर केलाच असेल. अनेकदा चेक बाउंस होण्याच्या घटना घडतात. तुमच्यासोबत ही असं झालंय का, की, तुम्ही चेक जारी केलाय आणि तो बाउंस झालाय? अशा परिस्थितीत खुप वाईट वाटतं, यासोबतच अनेकदा कायदेशीर अडचणीही निर्माण होऊ शकतात. अशावेळी सर्वात मोठा प्रश्न जास्तीत जास्त लोकांच्या मनात येतो. तो म्हणजे, चेक बाउंस झाल्याने माझा सिबिल स्कोअर खराब होईल का? याचं उत्तर जाणून घेणं गरजेचं आहे. जेणेकरुन संभ्रम निर्माण होऊ नये.
advertisement
CIBIL स्कोर म्हणजे काय? का महत्त्वाचा आहे? : सिबिल स्कोअर एक 1 अंकांची एक संख्या आहे. जी तुमची क्रेडिट हिस्ट्री आणि कर्ज फेडण्याची क्षमता दाखवते. 750+ स्कोअर हा चांगला मानला जातो. यामुळे बँक किंवा वित्तीय संस्था तुम्हाला विश्वासार्ह मानतात. ज्यामुळे लोन क्रेडिट कार्ड सहज आणि चांगल्या व्याजदरवार मिळते. बँक लोन किंवा क्रेडिट कार्ड देताना बँका मुख्यतः वेळेवर पेमेंट, लोनची विविधता आणि वेळेवर पेमेंटसारखे फॅक्टर्स पाहतात.
advertisement
चेक कधी बाउंस होतो? : ज्यावेळी बँक चेक क्लियर करू शकत नाही तेव्हा चेक बाउन्स होतो. यामागे प्रमुक कारण म्हणजे अकाउंटमध्ये परिपूर्ण बॅलेन्स नसणे. हस्ताक्षर मॅच न होणे, चुकीची तारीख टाकणे, ओव्हररायडिंग किंवा रक्कमेत अंक-शब्दांमध्ये फरक असणे, अकाउंट बंद असणेर, फ्रीज किंवा ब्लॉक होऊ शकते. herofincorp नुसार, ही सामान्य बँकिंग ट्रांझेक्शन आहे. मात्र नेगोशिएबल इंस्ट्रूमेंट्स अॅक्ट, 1881 च्या कलम 138 अंतर्गत जर पैसे मिळवणाऱ्याने तक्रार केली तर त्याला कायदेशीर नोटीस, दंड (चेक रकमेच्या दुप्पट पर्यंत) किंवा न्यायालय/तुरुंगवासाची कारवाई देखील होऊ शकते.
advertisement
चेक बाउंसचा सिबिल स्कोअरवर थेट परिणाम होतो? : चेक बाउंसचा थेट परिणाम सिबिल स्कोअरवर पडत नाही. CIBIL (TransUnion CIBIL) आणि इतर क्रेडिट ब्यूरो फक्त क्रेडिटशी संबंधित देवाण-घेवाण ट्रॅक करते. यात लोन, क्रेडिट कार्ड, ईएमआ, बिल पेमेंट हिस्ट्रीचा समावेश आहे. सामान्य सेव्हिंग/करंट अकाउंटशी संबंधित चेक बाउंसची माहिती क्रेडिट ब्यूरो रिपोर्ट केली जात नाही.
advertisement
याच कारणामुळे एक सामान्य चेक बाउंस तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये दिसत नाही. ज्यामुळे याचा स्कोअरवर लगेच परिणाम होत नाही. मात्र अप्रत्यक्ष परिणाम होतो. चेक एखाद्या लोनचा ईएमआय, क्रेडिट कार्ड बिल किंवा क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी दिला गेला असेल आणि बाउंस झाल्यावर पेमेंट मिस झाली तर डिफॉल्ट रिपोर्ट होईल.
advertisement
advertisement
अशा परिस्थिती काय करावं? : अकाउंटमध्ये लगेच पुरेसे बॅलेन्स टाका आणि पैसे मिळवणाऱ्याला पर्यायी पेमेंट करा. बँकेला बाउंस चार्ज आणि कारण विचारा, गरज पडल्यावर रिक्वेस्ट करा की, याला टेक्निकल समजून रिपोर्ट करु नका(ईएमआयशी संबंधित असेल तर). चे वारंवार बाउंस होऊ देऊ नका. डिजिटल पेमेंट्सचा वापर करा. तुमचा सिबिल स्कोअर नियमित चेक करा आणि काही चूक दिसल्यास सुधारा. कायदेशीर नोटिस आली असेल तर लगेच पैसे भरून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करा.






