advertisement

वाहतुकीचा नियम मोडणं त्याला पडलं पावणेतीन लाखांना; पुणेकरांनो, 'ही' एक छोटी चूक पडतीये प्रचंड महागात

Last Updated:

विश्रामबाग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्तीच्या मोबाइलवर वाहतूक नियम मोडल्याबाबतची एक फाईल पाठवण्यात आली होती.

आरटीओ (RTO) चलनाच्या नावाखाली फसवणूक (प्रतिकात्मक फोटो)
आरटीओ (RTO) चलनाच्या नावाखाली फसवणूक (प्रतिकात्मक फोटो)
पुणे: जर तुमच्या मोबाइलवर 'वाहतूक नियमभंग' म्हणजेच वाहतुकीचे नियम मोडल्याचा काही मेसेज आला असेल, तर सावधान. आधी या मेसेजबद्दल खात्री करून घ्या. कारण पुणे शहरातील टिळक रस्ता परिसरातील एका व्यक्तीला असा मेसेज उघडणं तब्बल पावणेतीन लाख रुपयांना पडलं आहे. सायबर चोरट्यांनी आरटीओ (RTO) चलनाच्या नावाखाली या नागरिकाची मोठी फसवणूक केली आहे.
नेमकी घटना काय?
विश्रामबाग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्तीच्या मोबाइलवर वाहतूक नियम मोडल्याबाबतची एक फाईल पाठवण्यात आली होती. ही फाईल आरटीओचे अधिकृत चलन असल्याचे भासवले गेले होते. तक्रारदाराने जशी ती फाईल उघडली, तसाच त्यांचा मोबाइल हॅक झाला. काही वेळातच चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यावर डल्ला मारत २ लाख ७५ हजार रुपये दुसऱ्या खात्यात वर्ग केले.
advertisement
पुणे शहरात सध्या अशा प्रकारच्या 'मालवेअर' फाईल्स पाठवून फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. केवळ वाहतूक चलनच नाही, तर थकीत वीज बिल, गॅस कनेक्शन कापले जाणे किंवा बँक केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली अशा फाईल्स किंवा लिंक्स पाठवल्या जातात. एकदा का तुम्ही ती फाईल डाऊनलोड केली की, तुमच्या मोबाइलचा ताबा चोरट्यांकडे जातो.
advertisement
विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण घोडके या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी पुणेकरांना आवाहन केले आहे की, अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कोणत्याही फाईल्स उघडू नका. अधिकृत चलन भरण्यासाठी नेहमी सरकारी संकेतस्थळाचाच वापर करा. तुमची एक छोटीशी चूक तुमचे बँक खाते रिकामे करू शकते.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
वाहतुकीचा नियम मोडणं त्याला पडलं पावणेतीन लाखांना; पुणेकरांनो, 'ही' एक छोटी चूक पडतीये प्रचंड महागात
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement