advertisement

Kitchen Hacks : इंडक्शनवर चपात्या बनवण्याची योग्य पद्धत माहितीये? अशी बनवा टम्म फुगलेली मऊसूत चपाती!

Last Updated:

How to make fluffy chapati on induction : इंडक्शन गॅसइतकं वेगाने काम करू शकत नाही. शिवाय इंडक्शनवर थेट गॅस नसतो अशावेळी बरीच लोकांना चपाती फुगवण्यासाठी प्रॉब्लेम येतो. मात्र आज आम्ही तुम्हाला इंडक्शनवर चपात्या बनवण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत.

इंडक्शनवर फ्लफी चपाती कशी बनवायची
इंडक्शनवर फ्लफी चपाती कशी बनवायची
मुंबई : गॅसवर आपण चपात्या वेगाने बनवतो. त्या गॅसच्या फ्लेमवर धरून आपल्याला छान फुगवुनही घेता येतात. पण इंडक्शन साहजिकच गॅस इतकं वेगाने काम करू शकत नाही. म्हणून यावर चपात्या बनवणं आपल्यासाठी थोडं अवघड होऊ शकतं. शिवाय इंडक्शनवर थेट गॅस नसतो अशावेळी बरीच लोकांना चपाती फुगवण्यासाठी प्रॉब्लेम येतो.
मात्र आज आम्ही तुम्हाला इंडक्शनवर चपात्या बनवण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. सोशल मीडियावर gorgeous_.hub या अकाऊंटच्या व्हिडिओमध्येही पद्धत सांगितली आहे. या पद्धतीने तुम्ही इंडक्शनवर सहज टम्म फुगलेली आणि मऊसूत चपाती तयार करू शकता. चला पाहूया इंडक्शनवर चपाती बनवण्याची सोपी पद्धत.
इंडक्शनवर चपाती बनवण्यासाठी या स्टेप्स करा फॉलो..
- इंडक्शनवर चपात्या बनवण्यासाठी इंडक्शनसाठी खास बनवलेला पॅन वापरा. इंडक्शनवरचा ​​पॅन जितका जड असेल तितक्या चांगल्या प्रकारे चपात्या भाजल्या जातात.
advertisement
- इंडक्शनवर बनवताण त्या लवकर कोरड्या होऊ शकतात. यासाठी चपातीची कणिक मळताना त्यामध्ये थोडं कोमट पाणी आणि एक चमचा तेल किंवा तूप टाका. यामुळं चपात्या मऊ राहतात, कडक होत नाहीत.
- चपाती पॅनवर टाकण्यापूर्वी इंडक्शन हॉब मध्यम आचेवर ठेऊन पॅन गरम करा. कारण पॅन व्यवस्थित तापलेला नसेल तर चपात्या कडक होतील. आणि खूप जास्त गरम असेल तर त्या जळतील.
advertisement
- चपाती लाटणं ती शक्यतो सर्व ठिकाणी सामान लाटलेली असावी. अन्यथा ती भाजताना जाड ठिकाणी कच्ची राहू शकते. चपाती पॅनवर टाका. ती एका बाजूने व्यवस्थित भाजू द्या. वरच्या बाजूला त्यावर फुगवटे दिसू लागले की उलटा. यानंतर दुसरी बाजूही व्यवस्थित भाजा.
- आता इंडक्शनवर थेट फ्लेम नसल्यामुळे चपाती स्वच्छ सुती कापडाच्या साहाय्याने कडा हळूवारपणे दाबून फुगवा. वाफेच्या दाबामुळे चपाती आपोआप फुगेल.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Gorgeous Hub (@gorgeous_.hub)



advertisement
- शेवटची आणि सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे चपाती पॅनवरून काढल्यानंतर तिला लगेच तेल किंवा तूप लावा.या यामुळे ती जास्तकाळ मऊ राहील. तसेच छपाई कासरोलमध्ये झाकून ठेवा.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kitchen Hacks : इंडक्शनवर चपात्या बनवण्याची योग्य पद्धत माहितीये? अशी बनवा टम्म फुगलेली मऊसूत चपाती!
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement