TRENDING:

12 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचे रणजीत पदार्पण

Videos

रणजी ट्रॉफीत घडला नवा इतिहास, 12 वर्षांच्या वैभव सूर्यवंशींची रणजीत पदार्पण, सचिन-युवराजलाही टाकलं मागे...

Last Updated: Jan 06, 2024, 17:06 IST
Advertisement

घरून नकार मिळाला, खिसा रिकामा होता, पण जिद्द मोठी होती! तनिष्क आणि साहिलची 'मोमोज' डायरी; दादरमध्ये खवय्यांची तुफान गर्दी!

Food

मुंबई: मुंबईतील दादर परिसरात तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरणारी एक यशोगाथा सध्या चर्चेत आहे. दादरमधील तनिष्क कनोजिया आणि साहिल जाधव या दोन मित्रांनी कॉलेजचे शिक्षण सुरू असतानाच स्वत:चा व्यवसाय उभारण्याचे धाडस केले. त्यांनी सुरू केलेला ‘यारी कट्टा’ नावाचा मोमोज स्टॉल अल्पावधीतच महाविद्यालयीन तरूणांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. सध्या तनिष्क आणि साहिल हे दोघेही परळच्या महर्षी दयानंद कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहेत.

Last Updated: Dec 24, 2025, 15:21 IST

वर्षाला ६ लाखांचा 'निव्वळ' नफा! १० गायी, ५ फॅन सोलापूरच्या 'या' शेतकऱ्याचा सक्सेस फॉर्म्युला नक्की पाहा!

Success Story

सोलापूर : अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करतात. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले रेवणसिद्ध शेळके दूध व्यवसायातून वर्षाला 5 ते 6 लाख रुपयांचा नफा मिळवत आहेत. त्यांनी या व्यवसायाची सुरुवात एका गायीपासून केली होती. त्यांच्याकडे आज 10 गायी आहेत. या संदर्भात अधिक माहिती रेवणसिद्ध शेळके यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.

Last Updated: Dec 24, 2025, 14:59 IST
Advertisement

"लोकांच्या जॉब वर आपलं भागत नाही.."  नोकरी सोडून अंडा रोल व्यवसाय 2 भावांच्या स्ट्रगलची यशस्वी कहाणी

Success Story

नाशिक: संकटाचे रूपांतर संधीत कसे करावे, याचे उत्तम उदाहरण नाशिकच्या दोन सख्ख्या भावांनी समाजासमोर ठेवले आहे. कोरोना काळात हातातली नोकरी गेल्यानंतर खचून न जाता, शरद शिलावट आणि समाधान शिलावट या दोन तरुणांनी सुरू केलेला नाशिक अंडा रोल वाला हा व्यवसाय आज यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. यामधून त्यांची महिन्याची उलाढाल आता लाखाच्या घरात आहे.

Last Updated: Dec 24, 2025, 14:29 IST

video: 16 वर्षीय मुलाने केली कमाल ! बनवली अशी मशीन ज्याने शेतकऱ्याच काम होणार सोप्पं

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील आहेरवाडी गावात राहणाऱ्या एका शेतकऱ्याच्या 16 वर्षीय मुलाने शेतकऱ्यांसाठी एक अनोखे मशीन बनवले आहे. या मशीनद्वारे नांगरणी, कोळपणी, पेरणी, फवारणी, ड्रिंचिंग, मल्चिंग आणि गवत कापता येणार आहे. तर या एकाच मशीनद्वारे जवळपास शेतकऱ्यांची सात कामे होणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही मशीन डिझेल किंवा पेट्रोलवर चालणारे नसून सौर ऊर्जेवर चालणार आहे. या संदर्भात अधिक माहिती विद्यार्थी दिनेश वाघमारे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.\r\n

Last Updated: Dec 24, 2025, 13:56 IST
Advertisement

वय वर्षे 62 अन् 1136 किमीचा सायकल प्रवास! पुण्याच्या माजी प्राचार्यांनी करून दाखवलं; आकुर्डी ते तिरुपती प्रवासाची प्रेरणादायी गोष्ट!

पुणे

पुणे : पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात राहणारे 62 वर्षीय अनिल खेडकर यांनी नुकताच आकुर्डी ते तिरुपती असा सायकल प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. तब्बल 1,136 किलोमीटरचा प्रवास करत त्यांनी सायकल चालवा आणि तंदुरुस्त राहा असा संदेश तरुणांना दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अनिल खेडकर सायकल प्रवासाच्या माध्यमातून विविध ठिकाणी भेटी देत आहेत. त्यांच्या या प्रेरणादायी सायकल प्रवासाबाबत त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.

Last Updated: Dec 24, 2025, 13:23 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
12 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचे रणजीत पदार्पण
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल