2024 च्या निवडणुकीत ओबीसी समाजाचा पाठिंबा मिळवण्याच्या दृष्टीनं भाजपनं खास रणनीती आखल्याचं बोललं जातंय. आणि त्यासाठीचं गुरुवारी दिल्लीतील भाजप मुख्यालयात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही हजेरी लावली.महाराष्ट्रातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे या बैठकीत सहभागी झाले होते.