गेल्या काही वर्षांतील राजकीय घडामोडी पाहिल्यास राजकारणात कधीच कोणी कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो हे वारंवार सिद्ध झालं आहे. कायम भाजपवर टीका करणारे अजित पवार भाजप युतीत सहभागी झाले. आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांविषयी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी असंच भाकीत केलंय.