प्रसिद्ध यूट्यूबर आणि बिगबॉस ओटीटीचा पहिला विजेता एल्विश यादव रेव्ह पार्टी प्रकरणी चांगलाच अडचणीत आला आहे. रेव्ह पार्टीत नशेसाठी सापाचं विष वापरण्यात आल्याचा नोएडा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे. रेव्ह पार्टीसाठी हे आरोपी विषारी साप पुरवत असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.