मुंबईची दिवाळी बघायची आहे आणि तुम्ही कंदील गल्लीची सफर केली नाही, तर कायच केलं. 50 वर्षांपेक्षा जास्त मोठा इतिहास आहे या ठिकाणाला. इथली दुकानं, दुकानदार, खरीददार, आणि कंदीलांची रोषणाई पाहाल तर पाहतच राहाल. हौशे-गौशे-नौश्यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन दाखवणारी ही गल्ली म्हणजे अविस्मरणीय अनुभव आहे.