छगन भुजबळांनी अंबडच्या ओबीसी एल्गार सभेत मनोज जरांगेवर सडकून टीका केल्यानंतर राजकीय वादाला तोंड फुटलंय. जरांगे विरुद्ध भुजबळ असा राजकीय सामना सुरु झालाय. अशातचं माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा स्वराज्य पक्ष भुजबळांविरोधात चांगलाच आक्रमक झाल आहे. संभाजीराजेंनी भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.