पाण्याच्या मुद्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार राजकारण पेटलंय. पाण्याच्या मुद्यावरून सांगलीचे भाजप खासदार संजय पाटील यांनी राजीनाम्याचा इशारा दिलाय. शंभुराज देसाई कोयना धरणाचे मालक आहेत का? असा सवालही पाटील यांनी उपस्थित केलाय. तर लोकसभेची निवडणूक जवळ आलेली असताना आणि पाण्याचा प्रश्न सुटलेला असताना कशाला राजीनामा देताय? असं प्रश्न विचारून आमदार अनिल बाबर यांनी पाटलांना पुन्हा डिवचलंय.