शिंदेंच्या सेनेकडून विद्यमान खासदार संजय मंडलिक यांची उमेदवारी अंतिम मानली जाते आहे. महाविकास आघाडीकडून गोकुळचे संचालक चेतन नरके यांनीही तयारी सुरू केली आहे. पण, आता दोघात तिसरा म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही जालंदर पाटील यांना रिंगणात उतरण्याची तयारी केल्याचे पाहायला मिळते आहे.