
आजच्या वाढत्या तणावपूर्ण जीवनशैलीत उच्च रक्तदाब म्हणजेच हायपरटेन्शन हा एक सर्वसामान्य पण गंभीर आरोग्याचा प्रश्न बनला आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही वर्षांत तरुणांमध्येही ब्लड प्रेशर वाढण्याचे प्रमाण चिंताजनकरीत्या नोंदवले जात आहे. यामागे काही मोठी कारणे आहेत आणि आश्चर्य म्हणजे ही सर्व कारणे आपल्या रोजच्या जीवनातील साध्या- सोप्या चुका आहेत. त्यामुळे या सवयींकडे दुर्लक्ष केल्यास हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक किंवा किडनीचे आजार यांसारख्या धोक्यांची शक्यता वाढते, असे बीड येथील आरोग्य तज्ञ सचिन बोरचाटे यांनी सांगितले.