
जालना : मोबाईल, इंटरनेटचे दुष्परिणाम लक्षात घेता जालना जिल्ह्यातील एका शाळेने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. गावातील मंदिर-मशिदीवरील भोंग्यामधून रात्री दोन तास विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास सांगितले जात आहे. या काळात कोणताही विद्यार्थी मोबाईल किंवा टीव्ही पाहणार नाही याची खातरजमा केली जात आहे. या उपक्रमाला पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहायला मिळत आहे.
Last Updated: Dec 23, 2025, 19:51 ISTराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी एक वक्तव्य केले आहे. त्यात त्या म्हणाल्या की, आमची सगळ्यांशी झाली आहे. महाविकास आघाडी आणि आम्ही एकत्र लढंलं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे.जागावाटपाचे काम अंतिम टप्प्यात आहे."
Last Updated: Dec 23, 2025, 21:28 ISTराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी एक वक्तव्य केले आहे. त्यात त्या म्हणाल्या की, आमची सगळ्यांशी झाली आहे. महाविकास आघाडी आणि आम्ही एकत्र लढंलं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे.जागावाटपाचे काम अंतिम टप्प्यात आहे."
Last Updated: Dec 23, 2025, 21:28 ISTनिवडणुकांचे जोरदार वारे वाहत असून माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एक अंदाज वर्तवला आहे.ते म्हाणाले की," जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. या चार आठ दिवसात कधीही जाहीर होतील.जसं आपण देशाच्या,राज्याच्या सत्तेत आहोत तसेच या जिल्हापरिषद निवडणुकांमध्येही झेंडा लावायला पाहिजे."
Last Updated: Dec 23, 2025, 21:11 ISTराज्याला हादरवून लावणारे सरपंच संतोष देशमुख प्रकरण खूपच चर्चेत आहे. वर्ष उलटले तरी आरोपींना शिक्षा झाली नव्हती. शेवटी या हत्या प्रकरणाचे आरोपी वाल्मिक कराडचे बीडच्या विषेश मकोका कोर्टाकडून आरोप निश्चित केले आहेत.खंडणी,हत्या,कटकारस्थान,अपहरण,पुरावे नष्ट करणे अशी वेगवेगळी कलमे लावली आहेत.
Last Updated: Dec 23, 2025, 20:52 ISTवंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड.प्रकाश आंबेडकर यांचे नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत बऱ्यापैकी उमेदवार विजयी झाले. आज चॅनलशी बोलताना "आम्ही कोणाकडे गेलो नाही,ते आमच्याकडे आले" असे वक्तव्य नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. पुढे ते म्हणाले, "काँग्रेसने जुना खेळ पुन्हा सुरु केला आहे.लोकांमध्ये बोलतात,त्याविरुद्ध ते वागतात."
Last Updated: Dec 23, 2025, 20:34 IST