
मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या परभणी महापालिकेच्या महापौरपदी मुस्लिम महापौर बसविण्याचा निर्णय शिवसेनेने घेऊन पक्षाची विकासात्मक वाटचाल वेगाने पुढे नेली आहे. हिंदुत्ववादी परभणीत शिवसेनेने सय्यद इक्बाल यांना महापौर पदाची संधी दिली आहे. कोणताही अनुभव पाठीशी नसताना राजकारणात नवखे असलेल्या सय्यद इक्बाल यांना थेट महापौरपदी बसून सर्वसामान्यांना नेता करण्याची परंपरा ठाकरे सेनेने अबाधित ठेवली. शिवसेना पक्षाचे राज्यातील एकमेव मुस्लिम महापौर म्हणून सय्यद इक्बाल यांची संपूर्ण राज्यभरात चर्चा होत आहे.तसेच विरोधकांनी ठाकरेंना ट्रोल केले आहे.मुस्लीम महापौर असल्याने वादाची ठिणगी पडली आहे. त्याचं चोख उत्तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिले.