
शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर घणाघात केला आहे. ते म्हणाले, " महाड नगरपालिका निवडणुकीत भाजपने काँग्रेस कार्यकर्त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला.हा किती गंभीर गुन्हा आहे.मंत्र्यांचा मुलगा गायब आहे.पोलीस ही खाकी वर्दीतली भाजपची टोळी आहे.मंत्र्यांची मुलं,भाऊ कसे सुटतात.हे देवेंद्र भडणवीसांना माहिती आहे.भाजप हा गुंडांचं राज्य चालवतं."असा प्रहार भाजपवर त्यांनी केला.
Last Updated: Dec 26, 2025, 17:16 ISTएका वर्तमानपत्रात सांस्कृतीक विभागाच्या जाहिरातीमध्ये गणपती बाप्पाला सांताक्लॉजची टोपी घालण्यात आली होती.त्यामुळे आता विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे.तर हिंदू महासभेकडून पुण्यात आंदोलनाचा इशारा दिला आहे.तसेच संबंधीत सांस्कृतीक मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक करत आहेत.
Last Updated: Dec 26, 2025, 18:53 ISTसध्या महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे.त्यामुळे राज्यात काही पक्षांच्या युती होताना पाहायला मिळत आहेत.त्यावरुन आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्यावर मोठं विधान केलं आहे.ते म्हणाले, "राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नसते.राजकारणात शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर कुणालाही आश्चर्य वाटू नये."
Last Updated: Dec 26, 2025, 18:35 ISTखोपोली नगरपालिकामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या निवडून आलेल्या नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची हत्या झाली.या हत्येचं कारण अजून समजले नाही.पण त्यांच्या नातेवाईकांनी पोलीसांवर आरोप केले आहेत. तसेच पोलीस स्टेशनला घेराव घातला आहे.
Last Updated: Dec 26, 2025, 17:57 ISTनागपूरच्या वर्धा परिसरात एक धक्कादायक घटना घडली. नागपूरमध्ये काल नाताळनिमित्त अनेक पब आणि बार चालू ठेवण्यात आले होते. त्यातील डाबो पबमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. तेव्हा पबमध्ये दोन युवकांच्या टोळीत वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, त्या वादानंतर एका मुलावर 4-5 जणांनी हल्ला केला आणि त्या मुलाची हत्या झाली. ही घटना प्राईड हॉटेल परिसरातील आहे.सोनेगाव पोलीसात या घटनेचा गुन्हा दाखल केला गेला. पण वादाचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. हत्या झालेल्या मुलाचे नाव प्रणय नारनव असं आहे.
Last Updated: Dec 26, 2025, 16:47 IST