TRENDING:

SPECIAL REPORT : "संकट ओळखा मुंबई वाचली पाहिजे" राज ठाकरेंचा एल्गार, कार्यकर्त्यांना मनसे साद..!

ठाकरे बंधूंची युती झाल्यावर मनसेचा पहिलाच मेळावा पार पडला. तेव्हा राज ठाकरेंनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे. ते म्हणाले, "महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी मुंबई महत्वाची आहे, त्यामुळे आपल्याला मुंबई वाचवायची आहे.निवडणुकीला एकजुटीनं सामोरं जा, मुंबई वाचली पाहिजे, त्यासाठी संकटं नीट ओळखा."

Last Updated: Dec 29, 2025, 20:29 IST
Advertisement

अन् किशोरी पेडणेकरांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं , VIDEO

ठाकरे गटाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना वॉर्ड क्रमांक 199 मधून उमेदवारी जाहीर झाली. त्या म्हणाल्या, "आता बऱ्यापैकी सगळ्यांना फॉर्म दिले गेले आहेत आणि मलाही मिळाला आहे. लढाई अटीतटीची, निक्रीची आहे. शिवसैनिक, मनसैनिक, मतदार आमच्यासोबत आहेत त्यांच्या जीवावर ही निवडणुक आम्ही लढणार आहोत. पण शेवट हा गोड झाला."

Last Updated: Dec 29, 2025, 21:42 IST

SPECIAL REPORT : मुंबईत पवारांच्या पक्षाला खिंडार,राखी जाधवांचा भाजपात प्रवेश

युद्ध सुरु होण्याआधीच शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांनी अचानक पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यानंतर त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे हा मोठा धक्का शरद पवार राष्ट्रवादी पक्षाला मानावा लागणार आहे. "त्या पक्षात असताना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही,अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे हा निर्णय मला घ्यावा लागला" असं त्यांनी पक्ष सोडण्याचं कारण सांगितलं

Last Updated: Dec 29, 2025, 21:17 IST
Advertisement

SPECIAL REPORT : पुण्यात महाविकास आघाडीत फूट, काका पुतण्या आले एकत्र

पुणे

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडली आहे. दोन्ही राष्ट्रवादी आपापल्या चिन्हावर लढणार. तर कार्यकर्त्यांसाठी एकत्र निवडूणक लढणार असल्याची रोहित पवारांची माहिती.

Last Updated: Dec 29, 2025, 20:59 IST

SPECIAL REPORT : एकीकडे विरोधात दुसरीकडे सोबत, सोयीची 'सोयरीक' कोण कोणासोबत ?

महानगर पालिकेच्या निवडणूकीत राज्यात धमाल पाहायला मिळते आहे. पण कोण कोणासोबत आहे तेच समजत नाही. महायुती आणि महाविकास आघाडी असे दोन प्रमुख घटक पक्ष आहेत. महायुतीत सत्ताधारी आणि महाविकास आघाडीत विरोधक आहेत. हे एकमेकांच्या विरोधात लढतील असे वाटले. पण राज्यात अभद्र युती आणि आघाडीचं पेव फुटलं आहे. जास्तीत जास्त जागा लढवायला मिळव्यात म्हणून सोयीची सोयरीक करताना पाहायला मिळते आहे.

Last Updated: Dec 29, 2025, 20:18 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
SPECIAL REPORT : "संकट ओळखा मुंबई वाचली पाहिजे" राज ठाकरेंचा एल्गार, कार्यकर्त्यांना मनसे साद..!
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल