TRENDING:

Krushi Market Rate: शेवग्यांच्या शेंगांनी अख्खा मार्केट खाल्ला, मार्केटमध्ये इतर भाजीपालांचे दर काय?

Last Updated:

सोमवार, दिनांक 29 डिसेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: सोमवार, दिनांक 29 डिसेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये गुळ, शेवगा आणि डाळिंबाची आवक व भाव पाहू.
advertisement

गुळाच्या आवकेत सुधारणा: राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 1244 क्विंटल गुळाची आवक झाली. यापैकी पुणे बाजारात 485 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 4206 ते 4408 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 336 क्विंटल गुळास 5450 रुपये सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.

शेवग्याची आवक: राज्याच्या मार्केटमध्ये आज 38 क्विंटल शेवग्याची आवक झाली. यापैकी रत्नागिरी बाजारात सर्वाधिक 8 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 2200 ते 2400 रुपये दरम्यान प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच अहिल्यानगर मार्केटमध्ये आवक झालेल्या 1 क्विंटल शेवग्यास 18000 ते 32000 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांद्याचे दर पुन्हा कोसळले, लिंबाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

डाळिंबाच्या आवकेत सुधारणा: आज राज्याच्या मार्केटमध्ये 1541 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी 845 क्विंटल सर्वाधिक आवक नागपूर बाजारात राहिली. त्यास सर्वसाधारण 5500 रुपये बाजारभाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 416 क्विंटल डाळिंबास प्रतीनुसार दहा ते पंधरा हजार रुपयांपर्यंत सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.

मराठी बातम्या/कृषी/
Krushi Market Rate: शेवग्यांच्या शेंगांनी अख्खा मार्केट खाल्ला, मार्केटमध्ये इतर भाजीपालांचे दर काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल