
पुण्यात पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळे पूजा मोरे यांना अर्ज मागे घ्यावा लागला. तेव्हा त्या ओक्साबोक्शी रडत म्हणाल्या, "आजचा दिवस खूप अवघड आहे. मी शेतकऱ्यांसाठी काम करत होते. शेतकऱ्यांच्या वेदना समजल्या कारण मी शेतकऱ्याची मुलगी होते. खूप कमी वयात न्यायालयाची पायरी चढावी लागली. मी पोलीसांच्या लाट्याकाट्या खाल्ल्या. मी नेहमीच महिला आणि शेतकऱ्यांसाठी काम केलं."
Last Updated: Jan 01, 2026, 15:48 ISTभाजपचे मंत्री नितेश राणे यांना सोशल मीडिया पोस्ट वरुन विरोधकांनी ट्रोल केले. तेव्हा वारिस पठाण यांच्या विधानाचा दाखला देत नितेश राणे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, "हिंदूंमध्ये फूट पाडण्याची सुपारी घेतलेली दिसते. मुंबईचा महापौर मराठीच होणार, हिंदूच होणार आणि आमच्याच पक्षाचा होणार."
Last Updated: Jan 01, 2026, 17:10 ISTमुंबई महापालिकेत उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांना मनसे नेते राज ठाकरेंची भेट घेतली. तेव्हा शर्मिला ठाकरेंनी या उमेदवारांचे औक्षण केले. त्यानंतर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. ते म्हणाले,"कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. बोगस मतदार सापडला तर फटकावून काढा."
Last Updated: Jan 01, 2026, 16:55 ISTउद्धव ठाकरें राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर बैठकीसाठी दाखल झाले आहेत. त्याच्यात महापालिकेच्या निवडणुक प्रचाराची रणनीती काय असणार आहेत ? या चर्चा होणार आहेl. या चर्चेकडे सर्वांचं लक्ष आहे.
Last Updated: Jan 01, 2026, 16:47 ISTनाशिकमध्ये भाजप वाद चव्हाट्यावर आला आहे. शहराध्यक्ष सुनील केदार यांना निष्ठावंत कार्यकर्त्यांनी घेराव घातला आहे. त्यांना उमेदवारी न दिल्याने ही नाराजी त्यांच्यात पाहायला मिळाली. ज्या उमेदवारांना तिकिट दिले आहे त्यांचं कार्य काहीच नाही. त्यांनी पैसे देऊन तिकिटं घेतल्याचा आरोप कार्यकर्ते करत आहेत.
Last Updated: Jan 01, 2026, 16:21 ISTउमेदवारी अर्ज भरण्याची उमेदवारी संपली. पण अजूनही पक्षांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. पुण्यात चक्क एकाच पक्षातील दोन उमेदवारांना उमेदवारी दिल्यामुळे एकाने चक्क एबी फॉर्मच गिळला. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.
Last Updated: Jan 01, 2026, 16:05 IST