2026 Release : 'बॉर्डर 2', 'दृश्यम 3', 'रामायण', 'धुरंधर 2'… 2026 मध्ये थिएटरमध्ये मोठ्या सिनेमांची रांग, OTT वर काय काय?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
2026 वर्षात मनोरंजनाचा महाडोस मिळणार आहे. अनेक मोठ्या कलाकारांचे मोस्ट अवडेट सिनेमे रिलीज होणार आहे. ओटीटीवरही हिट सीरिजचे नवे सीझन पाहायला मिळणार आहे.
advertisement
1/13

ओटीटी </a>दोन्हीकडे एकाहून एक बिग बजेट सिनेमे आणि मोस्ट अवटेड वेब सीरिजचा धमाका होणार आहे. एका बाजूला मोठे सुपरस्टार्स मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला गाजलेल्या वेब सीरिजचे नवे सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकत्याच समोर आलेल्या एका यादीनुसार, जानेवारीपासून नोव्हेंबर 2026 पर्यंत किती आणि कोणते सिनेमे तसंच वेब सीरिज रिलीज होणार आहेत. " width="1600" height="900" /> 2026 वर्ष हे मनोरंजन विश्वासाठी आणखी धमाकेदार ठरणार आहे. थिएटर आणि ओटीटी दोन्हीकडे एकाहून एक बिग बजेट सिनेमे आणि मोस्ट अवटेड वेब सीरिजचा धमाका होणार आहे. एका बाजूला मोठे सुपरस्टार्स मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला गाजलेल्या वेब सीरिजचे नवे सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकत्याच समोर आलेल्या एका यादीनुसार, जानेवारीपासून नोव्हेंबर 2026 पर्यंत किती आणि कोणते सिनेमे तसंच वेब सीरिज रिलीज होणार आहेत.
advertisement
2/13
2026 च्या सुरुवात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा 'राजा साब' 9 जानेवारी 2026 ला रिलीज होणार आहे. तर प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर सनी देओलचा 'बॉर्डर 2' हा सिनेमा 23 जानेवारीला रिलीज होणार आहे. 29 वर्षांनी पुन्हा एकदा सीमेवरील शौर्याची गाथा मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.
advertisement
3/13
शाहिद कपूरचा 'ओ रोमियो' हा सिनेमा 13 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. त्यानंतर राणी मुखर्जीचा मर्दानी 3 हा सिनेमा 27 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
advertisement
4/13
मार्च महिन्यातही दोन धम्माल सिनेमांचे पुढचे सीझन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आयुष्मान खुरानाचापती पत्नी और वो-2 हा सिनेमा 4 मार्च 2026 ला रिलीज होणार आहे. त्याचबरोबर अजय देवगणचा धमाल 4 हा सिनेमा 20 मार्चला रिलीज होणार आहे.
advertisement
5/13
2025 चा शेवट गाजवणारा धुरंधर हा सिनेमा 2026 मध्येही धुमाकूळ घालणार आहे. सिनेमाचा दुसरा भाग 19 मार्च 2026 ला रिलीज होणार आहे.
advertisement
6/13
एप्रिल महिन्यात अक्षय कुमारचा 'भूत बंगला' हा सिनेमा 2 एप्रिल आणि इमरान हाश्मीचा 'आवारापन 2' हा सिनेमा 3 एप्रिल 2026 ला रिलीज होणार आह. तर आलिया भट्टचा अ‍ॅक्शन पॅक्ड 'अल्फा' हा सिनेमा 17 एप्रिलला रिलीज होईल.
advertisement
7/13
सलमान खानचा बॅटल ऑफ गलवाल 17 एप्रिल 2026 ला रिलीज होणार आहे. सलमान खानच्या बर्थडे दिवशी सिनेमाची पहिली झलक शेअर करण्यात आली.
advertisement
8/13
2026 चा उत्तरार्ध बॉलिवूडचे मोठे स्टार गाजवणार आहे. ऑगस्ट महिन्यात दोन मोठे सिनेमे आमनेसामने येण्याची शक्यता आहे. कार्तिक आर्यनचा 'नागजिला' आणि रणबीर कपूर, आलिया भट्ट, विकी कौशल यांची मुख्य भूमिका असलेला 'लव्ह अँड वॉर' हे दोन्ही चित्रपट 14 ऑगस्टला रिलीज होणार आहेत.
advertisement
9/13
वर्षाच्या शेवटी अजय देवगणचा 'दृश्यम 3' हा सिनेमा 2 ऑक्टोबर 2026 ला रिलीज होणार आहे. साळगावकर फॅमिलीची गुढ कथा पुन्हा एकदा थ्रिल निर्माण करणार आहे.
advertisement
10/13
रणबीर कपूरचा मोस्ट अवडेट 'रामायण 1' हा सिनेमा 6 नोव्हेंबर 2026 रोजी रिलीज होणार आहे. हा या वर्षातील सर्वात भव्य आणि बहुप्रतिक्षित पौराणिक सिनेमा मानला जात आहे. या सिनेमाला टक्कर देण्यासाठी शाहरुख खानचा किंग सिनेमा देखील ऑक्टोबर - डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे.
advertisement
11/13
केवळ थिएटरच नाही तर ott प्लॅटफॉर्मवरही प्रेक्षकांना मोठ्या सीरिजची प्रतीक्षा आहे. यामध्ये प्रामुख्याने तीन मोठ्या सीरिजचा समावेश आहे.
advertisement
12/13
मिर्झापूर 4 (अ‍ॅमेझॉन प्राइम)- कालीन भैया (पंकज त्रिपाठी) आणि गुड्डू पंडित यांच्यातील सत्तासंघर्ष चौथ्या भागात कोणत्या वळणावर जातो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
advertisement
13/13
पंचायत 5 (अ‍ॅमेझॉन प्राइम)- फुलेरा गावची साधी पण मजेशीर कथा घेऊन सचिव जी (जितेंद्र कुमार) पुन्हा एकदा परतणार आहेत. त्याचप्रमाणे गुल्लक 5 (सोनी लिव)- मिश्रा कुटुंबाची गोड आणि वास्तववादी कथा पाचव्या सीझनमध्येही प्रेक्षकांना हसवणार आणि रडवणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
2026 Release : 'बॉर्डर 2', 'दृश्यम 3', 'रामायण', 'धुरंधर 2'… 2026 मध्ये थिएटरमध्ये मोठ्या सिनेमांची रांग, OTT वर काय काय?