TRENDING:

KDMC पाठोपाठ शिंदेंच्या शिवसेनेनं जळगाव पालिकेत विजयी हॅटट्रिक, एकाच दिवसात गेम चेंज!

Last Updated:

जळगाव महापालिकेत शिवसेना शिंदे गटाने बिनविरोध हॅटट्रिक साधली आहे. एकाच दिवसामध्ये शिंदे गटाचे ३ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
 विजय वाघमारे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

जळगाव: राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचं काउंउडाऊन सुरू झालं आहे. काही ठिकणी उमेदवार अर्ज मागे घेत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या विजयी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कल्याण डोंबिवली पाठोपाठ जळगाव महापालिकेत शिवसेना शिंदे गटाने बिनविरोध हॅटट्रिक साधली आहे. एकाच दिवसामध्ये शिंदे गटाचे ३ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे.

जळगाव महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने बिनविरोध निवडीची हॅट्रिक साधली आहे. प्रभाग क्रमांक ९ ब मधून प्रतिभा गजानन देशमुख या बिनविरोध झाल्या आहेत. त्यांच्या विरोधातील एकमेव अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्यामुळे त्या बिनविरोध झाल्या. एकाच दिवसात शिंदे गटाचे तब्बल तीन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ताकद वाढल्याचे चित्र आहे.

advertisement

प्रतिभा देशमुख बिनविरोध होताच शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या बाहेर फटाके फोडून आणि गुलालाची उधळण करत जल्लोष केला. सध्याच्या स्थितीत जळगाव महापालिकेत भाजपाचा एक तर शिवसेना शिंदे गटाचे तीन उमेदवार बिनविरोध झाले आहेत.

'प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याची' प्रतिक्रिया प्रतिभा देशमुख यांनी यावेळी दिली. तर उद्या अंतिम दिवशी शिवसेना सिंदगी गटाचे आणखी काही उमेदवार बिनविरोध होऊ शकतात, असे संकेत शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी दिले आहेत.

advertisement

तर दुसरीकडे, जळगाव महापालिकेत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मनोज चौधरी बिनविरोध विजयी झाले आहे.  प्रभाग क्रमांक 9 अ मधून शिंदे गटाचे उमेदवार मनोज चौधरी बिनविरोध विजयी झाले आहे.  मनोज चौधरी यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष आमदार राहुल लोखंडे यांनी माघार घेतल्याने मनोज चौधरींचा विजयाचा मार्ग मोकळा झाला.

आमदार सोनवणेंचा मुलगा झाला नगरसेवक

advertisement

 तर, जळगाव महापालिकेत शिवसेना शिंदे गटाचा खात्रीशीर गड तयार झाल्याचं स्पष्ट झालं असून आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या चिरंजीव डॉ. गौरव सोनवणे यांची महापालिकेसाठी बिनविरोध निवड झाली आहे. विशेष म्हणजे, वडिलांच्या प्रभागातूनच उमेदवारी दाखल करत डॉ. गौरव सोनवणे यांनी विरोधकांना मैदान सोडायला भाग पाडलं. या बिनविरोध निवडीमागे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी केलेल्या विकासकामांची पावती मतदारांनी दिल्याची प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
खाकीचं स्वप्न हुकलं, तरुणानं उभारला पाणीपुरी व्यवसाय, महिन्याला 80000 कमाई
सर्व पहा

“आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या कामावर जनतेचा विश्वास आहे, त्यामुळेच आज शिवसेना शिंदे गटाची ही जागा बिनविरोध झाली,” असं ठणकावून सांगत मंत्री पाटील यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा लगावला.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
KDMC पाठोपाठ शिंदेंच्या शिवसेनेनं जळगाव पालिकेत विजयी हॅटट्रिक, एकाच दिवसात गेम चेंज!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल