TRENDING:

मटणापासून ते सगळेच मासे, 140 वर्षे जुनं पुण्यातलं हे मार्केट तुम्हाला माहितीये का? Video

Last Updated:

शंभराहून अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या या बाजारपेठेने काळाच्या ओघात अनेक बदल पाहिले असले तरी आजही येथे जुन्या व्यापारी परंपरेचा जिवंत वारसा जपला जात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे शहराला समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभला असून आजही अनेक स्थळे त्या इतिहासाची साक्ष देताना दिसतात. शहरातील जुनी बाजारपेठा, पेठा आणि पारंपरिक व्यापारी केंद्रे ही पुण्याच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनाचा महत्त्वाचा भाग राहिली आहेत. कॅम्प परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मार्केट हे त्यापैकीच एक महत्त्वाचे आणि ऐतिहासिक व्यापारी केंद्र मानले जाते. शंभराहून अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या या बाजारपेठेने काळाच्या ओघात अनेक बदल पाहिले असले तरी आजही येथे जुन्या व्यापारी परंपरेचा जिवंत वारसा जपला जात आहे.
advertisement

ब्रिटिशकालीन पुण्यात व्यापार वाढू लागल्यानंतर 1885 साली या मार्केटची स्थापना करण्यात आली. सुरुवातीच्या काळात येथे भाजीपाला, फळे, मटण तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तू विकणारी लहान दुकाने सुरू झाली. आसपासच्या गावांतील शेतकरी आणि व्यापारी आपला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या बाजारात येत असत. त्यामुळे हा बाजार परिसरातील नागरिकांसाठी विश्वासार्ह खरेदी केंद्र बनला.

advertisement

आजही या मार्केटमध्ये पारंपरिक पद्धतीची दुकाने, जुनी व्यापारी संस्कृती पाहायला मिळते. सकाळपासूनच येथे ग्राहकांची मोठी गर्दी असते. भाजीपाला, मासे, मटण, चिकन यांसह विविध पदार्थ आणि दैनंदिन वस्तू येथे सहज उपलब्ध होतात. विशेष म्हणजे अनेक दुकाने कुटुंबीयांच्या पिढ्यानपिढ्या चालत आली आहेत, त्यामुळे या बाजारपेठेचा इतिहास आणि परंपरा जपली गेली आहे.

स्थानिक व्यापारी लक्ष्मीकांत अभंगय यांनी सांगितले की, या मार्केटची स्थापना 1885 साली झाली असून आमची तिसरी पिढी येथे व्यवसाय करत आहे. पूर्वी येथे अनेक व्यावसायिक होते. मात्र आता त्यांची संख्या कमी झाली आहे. कोरोना काळात अनेक व्यवसाय बंद झाले आणि नवीन पिढी या व्यवसायाकडे येण्यास फारशी उत्सुक दिसत नाही.

advertisement

View More

ते पुढे सांगतात की, मार्केटमध्ये चिकन, फिश आणि भाजीपाला यांची मोठी बाजारपेठ आहे. चिकन आणि फिश मार्केट विशेषतः चांगले चालते. येथे रोज ताजे मासे आणि मटणाचे विविध प्रकार उपलब्ध असतात. बोकड, मेंढी आणि बकरा यासाठी स्वतंत्र विभाग आहे, तर बीफसाठी वेगळा विभाग ठेवण्यात आला आहे. माशांमध्ये सुरमई, पापलेट, वाम, खेकडे असे अनेक प्रकार मिळतात. तसेच कोंबडीचे मटणही उपलब्ध असते. भाजीपाला मुंबई आणि पुण्यातील गुलटेकडी मार्केटमधून येथे येतो. भाजीपाल्याची दररोजची आर्थिक उलाढाल साधारणपणे 20 ते 25 लाख रुपयांपर्यंत होते.

advertisement

बीफ मार्केटमध्येही मोठ्या प्रमाणावर व्यापार चालतो. येथील व्यापारी सादिक कुरेशी यांनी सांगितले की, हे पुणे शहरातील एक ऐतिहासिक मार्केट आहे. येथे बीफ मार्केटमध्ये सुमारे 54 व्यावसायिक कार्यरत आहेत. अनेक पिढ्यांपासून आमचा हा व्यवसाय सुरू आहे आणि आजही ग्राहकांचा विश्वास कायम आहे.

कॅम्प परिसरात झपाट्याने होणारे शहरीकरण, आधुनिक मॉल्स आणि सुपरमार्केट्सची वाढ यामुळे पारंपरिक बाजारपेठांवर काही प्रमाणात परिणाम झाला असला तरी शिवाजी मार्केटने आपली ओळख टिकवून ठेवली आहे. स्थानिक नागरिकांसाठी ताजी भाजी, मांसाहारी पदार्थ आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू एकाच ठिकाणी मिळण्याचे हे विश्वासार्ह केंद्र आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
reel star ची शूटसाठी आवडती जागा, मुंबईत इथं येईल गोव्यासारखा फील, तुम्ही दिलीये कधी भेट?
सर्व पहा

इतिहास, परंपरा आणि स्थानिक व्यापाराची सांगड घालणारे शिवाजी मार्केट हे केवळ खरेदीचे ठिकाण नसून पुण्याच्या जुन्या व्यापारी संस्कृतीचे जिवंत प्रतीक म्हणून आजही ओळखले जाते.

मराठी बातम्या/पुणे/
मटणापासून ते सगळेच मासे, 140 वर्षे जुनं पुण्यातलं हे मार्केट तुम्हाला माहितीये का? Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल