advertisement

'सुनेत्रा पवारांना विधान परिषदेवर बिनविरोध द्या, बारामतीत निवडणूक लढवणारच', लक्ष्मण हाकेंचं थेट सत्ताधाऱ्यांना चॅलेंज

Last Updated:

आम्हाला खलनायक करताय मग तुम्ही शरद पवार पार्थ पवार यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठवलं ना? तुमच्या धमक असेल तर तुम्ही कोणताही उमेदवार उभा करा

News18
News18
बारामती: राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पोट निवडणूक होणार आहे. अजितदादांच्या निधनानानंतर ही बारामतीत पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी चर्चा सुरू असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामतीत निवडणूक लढवण्याचा चंग बांधला आहे. 'निवडणूक लढली पाहिजे असा लोकांचा आग्रह आहे. निवडणूक बिनविरोध करणं हे लोकशाही विरोधी कृती आहे. सुनेत्रा पवारांना विधान परिषदेवर बिनविरोध द्या' असा अजब सल्लाच आता लक्ष्मण हाकेंनी दिली.
लक्ष्मण हाके यांनी बारामतीमध्ये आले होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी बारामतीत पोटनिवडणूक लढवण्यावर आपण ठाम असल्याचं हाकेंनी सांगितलं.
"विधानसभा मतदारसंघांमध्ये बारामती विधानसभा पोट निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाली आहे. कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की ही पोटनिवडणूक लढली पाहिजे. त्या पार्श्वभूमीवर मी बारामतीकरांच्या भेटी घेत आहे. पुढील चार-पाच दिवस मी नागरिकांच्या भेटीसाठी येणार आहे. निवडणूक लढली पाहिजे असा लोकांचा आग्रह आहे. निवडणूक बिनविरोध करणं हे लोकशाही विरोधी कृती आहे. इथं सहानुभूती आहे दादांचं अपघाती निधन झालं आहे, बारामतीकरांच्या मनात दुःख असणं हे स्वभाविक आहे. .एक महिला महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री झाली ही गोष्ट ही चांगली आहे. जर अजितदादांच्या अपघाती निधनाबद्दल एवढं दुःख असेल तर सुनेत्रा पवारांना तुम्ही बिनविरोध विधान परिषदेवर घ्या, असा सल्ला हाकेंनी दिली.
advertisement
राज्य शासनाच्या अनेक धोरणांच्या विरोधात आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. आमचं पंचायत राज मधलं आरक्षण गेलं आहे आम्हाला माणसांना मिळत नाही बजेट मिळत नाही. आम्ही निवडणुकीला उभे राहतोय यांच्या पोटात गोळा आम्हाला बदनाम करताय. आम्हाला खलनायक करताय मग तुम्ही शरद पवार पार्थ पवार यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठवलं ना? तुमच्या धमक असेल तर तुम्ही कोणताही उमेदवार उभा करा आम्ही तुम्हाला पराभूत करून दाखवू हा विश्वास द्यायला मी बारामती चालू आहे' असं आव्हानचं हाकेंनी दिलं.
advertisement
आमच्याही मनात दुःख आहे मग तुम्ही सुनेत्रा पवारांना वरिष्ठ सभागृहात बिनविरोध पाठवा. जनतेचे प्रश्न जिथल्या तिथे आहेत. सर्व श्रीमंत मंडळी सत्ताधारी पक्षाच्या बाजूला जातात. आम्ही चळवळीतील मंडळी जिथल्या तिथेच आहोत. जनसामान्यांनी नक्की विश्वास कोणावर ठेवायचा.आम्ही किती दिवस आंदोलन करायची. बारामतीची निवडणूक शासनाचे विरोधात आम्ही ठामपणे लढवू.एक महाराष्ट्राची महिला उपमुख्यमंत्री झाली दादांची पत्नी आहे, दुःखद घटना आहे जसं तुम्ही शरद पवारांना पार्थ पवारांना वरिष्ठ सभागृहात पाठवलं तसं तुम्ही सुनेत्रा पवारांना विधान परिषदेत घ्या. बारामती तुम्ही दुसरा उमेदवार द्या आम्ही त्याला पराभूत करून दाखवू, विधानसभा कोणी लढवावी, कोणते पवार चालतील. दादांच्या कुटुंबा व्यतिरिक्त कोणत्यांही पवाराने निवडणूक लढवावी आम्ही त्यांना पराभूत करून दाखवू, असंही हाके म्हणाले.
advertisement
"आम्ही लढणार आहोत पण अजून एक आम्ही त्यांना संधी देत आहोत, आम्ही माणसं आहोत, आम्हाला संवेदना कळतात. दुःखद प्रसंग कळतोय. तुमच्या मनात जी भावना आहे तीच आमच्या मनात आहे पण आम्हाला प्रत्येक प्रश्नावर बेदखल का करत आहात. कधी ही मुख्यमंत्र्यांनी फोन केला नाही तिथल्या राज्यकर्त्यांनी फोन केला नाही.,
"अनेक प्रश्न आहेत, भ्रष्टाचाराचे प्रश्न आहेत, कॉन्ट्रॅक्टरांचं उकळ पांढरे करण्यासाठी येथे विकास दिसतो. प्रश्न अनेक आहेत, उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न कारखानदार मजुरांचे प्रश्न वेगळे आहेत. ज्या सभासदांच्या मुलांसाठी या संस्था चालतात त्यांच्या सुद्धा अपेक्षा इथे पूर्ण होत नाहीत. बारामतीत मी काय नवीन आलो नाही बारामती तालुक्यातल्या प्रत्येक गावात वाड्यावर माणसांचे अनेक प्रश्न आहेत. स्थानिक राष्ट्रीय पक्ष आम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहेत आणि त्यांचे प्रश्न आम्हाला आले आहेत. राष्ट्रीय पक्ष कोणते आहेत तुम्हाला चांगलं माहित आहे. पवार फॅमिलीच्या पक्षाचे राष्ट्रीयत्व आहे का ते एकदा चेक करा. राष्ट्रीय पक्षाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांची मला फोन आहेत यावरती उद्या परवा सविस्तर बोलू, असंही हाके म्हणाले.
advertisement
बारामतीची निवडणूक का लढायची आहे? 
बारामती परिसरातील ओबीसी बांधवांचा आग्रह आहे. बारामती तालुक्यातील प्रत्येक गावात आम्ही पोहोचू. आम्ही संविधान चांगलं जाणतो. तिथे हुकूमशाही घराणेशाही हा प्रश्न लोकशाहीत प्रश्न उरत नाही, जनतेच्या प्रश्नावर निवडणुका लढवल्या जातात. याच प्रश्नावरून आम्ही निवडणुकीकडे पाहतोय. परत एकदा सांगतोस सुनेत्रा ताईंना विधान परिषदेवर बिनविरोध घ्यावे, या सत्ताधाऱ्यांनी एक उमेदवार आमच्या समोर द्यावा आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. राहुरीला निवडणूक लागते बारामती देखील निवडणूक लागणार. लोकशाहीतील सर्व मार्गाचा अवलंब आम्ही चळवळीतील कार्यकर्ते म्हणून करणार, असंही हाकेंनी ठामपणे सांगितलं.
advertisement
शरद पवारांच्या भाषेत अपघात झाला आहे रोहित पवारांच्या भाषेत घातपात
जनता भावनिक आहे सर्वसामान्य माणसं दुःखी आहेत. सर्वसामान्य माणसं दादाच्या अपघातानंतर तर दुःखी होतीच पण रोहित पवार यांच्या रोजच्या प्रेझेंटेशन मुळे अजून ही लोक संभ्रमा अवस्थेत आहेत. एका बाजूला शरद पवार म्हणतात की हा घातपात नसून अपघात आहे. दुसरीकडे त्यांचाच नातू जो त्यांचा वारस बनू पाहतोय तो म्हणतोय की हा घातपात आहे. पवार साहेबांची एक भूमिका आणि रोहित पवार यांची एक भूमिका हे काय गौडबंगाल आहे आम्हाला कळालं नाही. सत्ताधाऱ्यांचं नक्की काय गौडबंगाल आहे. त्यामुळे जनतेच्या मनात दुःखाची भावना आहे, पण सत्ताधाऱ्यांना फक्त सत्ता कळते सत्तेतील टायमिंग कळतं. राजकारणातील स्पिरिट शोधायला रोहित पवार रात्रंदिवस पत्रकार परिषद घेत आहेत. शरद पवारांच्या भाषेत अपघात झाला आहे रोहित पवारांच्या भाषेत घातपात झाला आहे. इथल्या शासकीय यंत्रणांनी शोधला लावावा, अशी मागणीही हाकेंनी केली.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
'सुनेत्रा पवारांना विधान परिषदेवर बिनविरोध द्या, बारामतीत निवडणूक लढवणारच', लक्ष्मण हाकेंचं थेट सत्ताधाऱ्यांना चॅलेंज
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement