Sleep Apnoea : झोपेत मोठ्यानं घोरताय ? झोप झाल्यावरही थकवा जाणवतोय ? असू शकतात स्लीप एप्नियाची लक्षणं, वेळेत करा उपचार
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
स्लीप ॲप्नियाचे दोन प्रकार आहेत: ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्निया (OSA) आणि सेंट्रल स्लीप ॲप्निया. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्नियामधे घशाचे स्नायू श्वासनलिकेवर दाब टाकतात, ज्यामुळे झोपेत श्वास घेण्यास अडचण येते. या समस्येवर नियंत्रण मिळवता यावं यासाठी योग्य निदान होणं महत्त्वाचं आहे.
मुंबई : झोप म्हणजे शरीराची दुरुस्तीची वेळ पण झोपेत अडथळा आला तर त्याचे परिणाम दिवसभर जाणवू शकतात. काही कारणांमुळे तुमच्याही झोपेत अडथळे येत असतील तर वेळीच सावध व्हा.
झोपेत मोठ्यानं घोरताय किंवा झोप झाल्यावरही थकवा जाणवत असेल तर ही स्लीप एप्नियाची लक्षणं असू शकतात. यावर वेळेत उपचार करा. स्लीप ॲप्निया म्हणजे, ज्यात झोपेत असताना तुमचा श्वास वारंवार थांबतो.
स्लीप ॲप्नियाचे दोन प्रकार आहेत: ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्निया (OSA) आणि सेंट्रल स्लीप ॲप्निया. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्नियामधे घशाचे स्नायू श्वासनलिकेवर दाब टाकतात, ज्यामुळे झोपेत श्वास घेण्यास अडचण येते. या समस्येवर नियंत्रण मिळवता यावं यासाठी योग्य निदान होणं महत्त्वाचं आहे.
advertisement
मोठ्यानं घोरणं - घोरण्याला अनेकदा गाढ झोपेचं लक्षण समजलं जातं, पण प्रत्यक्षात ते एक धोक्याचं चिन्ह आहे. श्वासनलिका अरुंद झाल्यामुळे असं होऊ शकतं. रात्री मोठ्यानं घोरत असाल किंवा त्यामुळे दुसऱ्याच्या झोपेत व्यत्यय येत असेल, तर हे स्लीप ॲप्नियाचं एक ठळक लक्षण आहे.
advertisement
झोपेत असताना घोरणं किंवा धाप लागणं - गुदमरल्यासारखं वाटल्यामुळे झोपेतून कधी अचानक जाग येऊ शकते. स्लीप ॲप्निया म्हणजे झोपेत असताना काही सेकंदांसाठी श्वास पूर्णपणे थांबणं. शरीराला ऑक्सिजनची कमतरता जाणवते, तेव्हा मेंदू तुम्हाला अचानक जागं करतो. या दरम्यान, ती व्यक्ती अचानक घोरू शकते किंवा श्वास घेता येत नसल्यामुळे धाप लागू शकते. यामुळे हृदयावरही खूप ताण येतो.
advertisement
दिवसभर झोप आणि थकवा जाणवणं - रात्री सात-आठ तास झोपल्यानंतरही ताजंतवानं वाटत नसेल, तर याचा अर्थ झोपेची गुणवत्ता खराब झाली आहे. स्लीप ॲप्नियामुळे श्वास वारंवार थांबतो, ज्यामुळे व्यक्तीला गाढ झोप लागत नाही. यामुळे ऑफिसमधे काम करताना, चित्रपट पाहताना किंवा गाडी चालवतानाही पटकन झोप येऊ शकते.
सकाळची डोकेदुखी - सकाळी उठल्यावर डोक्याच्या दोन्ही बाजूंना जडपणा किंवा वेदना होत असल्याची तक्रार अनेक जण करतात. रात्रभर शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे आणि कार्बन डायऑक्साइडची पातळी वाढल्यामुळे असं होऊ शकतं. मेंदूला पुरेसा ऑक्सिजन पुरवठा न झाल्यामुळे सकाळी तीव्र डोकेदुखी होऊ शकते.
advertisement
झोपेत व्यत्यय आणि रात्रभर अस्वस्थता - ॲप्नियानं त्रासलेली व्यक्ती रात्रभर तळमळू शकते. लघवीसाठी वारंवार जागं येणं किंवा कोणतंही कारण नसताना अचानक जाग येणं ही याची लक्षणं आहेत. एखाद्या व्यक्तीला हलकी झोप लागल्यासारखं वाटू शकतं, पण प्रत्यक्षात त्यांचं शरीर श्वास घेण्याच्या प्रयत्नात सतत जागं होत असतं.
advertisement
स्लीप ॲप्निया म्हणजे केवळ झोपेची कमतरता नव्हे. यावर उपचार केले नाहीत तर, उच्च रक्तदाब, टाईप 2 मधुमेह आणि पक्षाघात म्हणजेच स्ट्रोक सारख्या जीवघेण्या आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 17, 2026 6:20 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Sleep Apnoea : झोपेत मोठ्यानं घोरताय ? झोप झाल्यावरही थकवा जाणवतोय ? असू शकतात स्लीप एप्नियाची लक्षणं, वेळेत करा उपचार










