Shukra Shani Yuti: गुरुच्या राशीत शुक्र-शनिची जुगलबंदी; या 3 राशींच्या नशिबाचं दार उघडण्याची वेळ आली
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology Marathi: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे होणारे राशीपरिवर्तन काही राशींना लकी तर काही राशींना अनलकी ठरत असते. ग्रहगोचर आणि नक्षत्रगोचर यांचा राशीचक्रावर परिणाम दिसून येतो. भाग्याची साथ कोणाला कशी मिळेल, याचा अंदाज ग्रहांच्या स्थितीवरून लावतात.
advertisement
advertisement
advertisement
मिथुन - शनी आणि शुक्राची युती मिथुन राशीच्या भाग्याला चालना देईल. कमाईत लक्षणीय वाढ दिसून येईल. तुमची प्रलंबित कामेही पूर्ण होतील. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर वेळ अनुकूल आहे. भागीदारीच्या कामातून चांगला नफा मिळेल. परदेशातून नोकरीच्या संधी येऊ शकतात. तुम्ही इच्छित सहलीला जाऊ शकता.
advertisement
कर्क - शनी आणि शुक्राची युती कर्क राशीसाठी अत्यंत शुभ ठरेल. कामात यश मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल. नोकरी बदलण्यासाठी वेळ अनुकूल दिसत आहे. अनपेक्षित आर्थिक लाभाची शक्यता आहे. व्यवसायातून चांगली कमाई होईल. भागीदारीतून भरीव नफा मिळेल. जमीन खरेदी होण्याची शक्यता आहे. कार्यालयात तुमचे बॉस तुमच्या कामाची प्रशंसा करतील.
advertisement
मीन - शनि आणि शुक्राच्या युतीमुळे मीन राशीची आर्थिक परिस्थिती सुधारेल. 26 मार्चपर्यंतचा काळ तुमच्यासाठी उत्तम असेल. तुमच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल. तुम्ही विविध मार्गांनी पैसे कमावण्यात यशस्वी व्हाल. गुंतवणुकीतूनही चांगला नफा अपेक्षित आहे. तुमची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. तुम्ही जुन्या कर्जातून मुक्त व्हाल. तुम्हाला एखादा मोठा प्रकल्प मिळू शकतो.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)









