advertisement

भारतीय क्रिकेटमधलं सगळ्यात मोठं भांडण मिटलं, जडेजा-मांजरेकरांची दुष्मनी संपली, कुणी केली मध्यस्थी?

Last Updated:

रवींद्र जडेजा आणि संजय मांजरेकर यांच्यात झालेला वाद क्रिकेट विश्वात सर्वश्रुत आहे. 2019 साली संजय मांजरेकर यांनी जडेजाचा उल्लेख बिट्स ऍण्ड पिसेस खेळाडू असा केला होता.

भारतीय क्रिकेटमधलं सगळ्यात मोठं भांडण मिटलं, जडेजा-मांजरेकरांची दुष्मनी संपली, कुणी केली मध्यस्थी?
भारतीय क्रिकेटमधलं सगळ्यात मोठं भांडण मिटलं, जडेजा-मांजरेकरांची दुष्मनी संपली, कुणी केली मध्यस्थी?
मुंबई : भारताचे माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर संजय मांजरेकर त्यांच्या स्पष्टवक्तेपणाबद्दल कायमच चर्चेत असतात. या स्पष्टवक्तेपणामुळे मांजरेकर अनेकदा वादातही सापडतात. रवींद्र जडेजा आणि संजय मांजरेकर यांच्यात झालेला वाद क्रिकेट विश्वात सर्वश्रुत आहे. 2019 साली संजय मांजरेकर यांनी जडेजाचा उल्लेख बिट्स ऍण्ड पिसेस खेळाडू असा केला होता, त्यानंतर जडेजा संतापला आणि त्याने मांजरेकरांना प्रत्युत्तर दिलं होतं.
आता 7 वर्षांनंतर जडेजा आणि मांजरेकर यांच्यात सगळं काही ठीक झालं आहे. आयपीएल 2026 च्या आधी रवींद्र जडेजा आणि संजय मांजरेकर यांचा सोशल मीडिया व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ एका जाहिरातीचा आहे. एवढंच नाही तर या जाहिरातीमध्ये मांजरेकर बिट्स ऍण्ड पिसेस या शब्दांचा उल्लेखही करत आहेत. या दोघांना एकत्र पाहून जडेजा आणि मांजरेकरांची दुष्मनी संपल्याच्या प्रतिक्रिया चाहते देत आहेत. रवींद्र जडेजाने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
advertisement

काय होता बिट्स ऍण्ड पिसेस वाद?

2019 साली जडेजाच्या कामगिरीमध्ये बराच चढ-उतार पाहायला मिळाला. जडेजाच्या या कामगिरीवर मांजरेकर यांनी निशाणा साधला. 'बिट्स ऍण्ड पिसेस मध्ये कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा मी प्रशंसक नाही. जडेजा वनडेमध्ये तेच करत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये तो उत्कृष्ट बॉलर आहे, पण वनडे क्रिकेटमध्ये मी त्याच्याऐवजी टीममध्ये स्पेशल बॅटर किंवा स्पिनरला पसंती देईन', असं मांजरेकर म्हणाले होते.
advertisement
संजय मांजरेकर यांच्या या टीकेला रवींद्र जडेजानेही प्रत्युत्तर दिलं होतं. 'मी तुझ्यापेक्षा दुप्पट मॅच खेळल्या आहेत आणि आताही खेळत आहे. कुणी काही मिळवलं असेल तर त्याचा सन्मान करायला शिका. मी तुझं खूप बकवास ऐकलं आहे', असं जडेजा म्हणाला होता.
संजय मांजरेकर यांनी फक्त रवींद्र जडेजाच नाही तर विराट कोहली आणि गौतम गंभीरवरही टीका केली होती. याशिवाय त्यांनी केव्हिन पिटरसन आणि कायरन पोलार्ड यांच्यावरही निशाणा साधला होता, ज्यामुळे सोशल मीडियावर बराच वाद झाला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
भारतीय क्रिकेटमधलं सगळ्यात मोठं भांडण मिटलं, जडेजा-मांजरेकरांची दुष्मनी संपली, कुणी केली मध्यस्थी?
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement